गोकुळ देणार जातिवंत दुधाळ म्हशी आणि 30 हजारांचे अनुदान milk subsidy gokul

milk subsidy gokul कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांच्या (गोकुळ) पुढाकारातून केर्लीमध्ये जातिवंत म्हैस विक्री केंद्र सुरू झाले आहे . या केंद्राचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘ गोकुळ मार्फत ‘ या म्हैस विक्री केंद्रवर खरेदी करण्यात आलेल्या म्हशीसाठी 30 हजार रुपयाचे अनुदान दिले जाणार आहेत.


गोकुळ व एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस , नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या या केंद्रात जातिवंत मुऱ्हा, मेहसाणा, जाफराबादी म्हशी शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.
श्री. डोंगळे म्हणाले, केर्लीतील केंद्रातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना जातीवंत, दुधाळ व सशक्त म्हशी उपलब्ध होणार असून यामुळे म्हैस दूध उत्पादन मध्ये वाढ होण्यासाठी निश्चितच चालना मिळणार आहे . जिल्ह्यामधील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी संघ नियमानुसार आपल्या आवडीनुसार स्वतःच्या जबाबदारीने उडदाची खात्री करूनच या केंद्रातून म्हशी खरेदी कराव्यात आणि त्यांची चांगली व्यवस्थापनाद्वारे संगोपन करावे .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

milk subsidy gokul गोकुळ मार्फत 30 हजार रुपयाचे अनुदान

म्हैस विक्री केंद्रमध्ये खरेदी केलेल्या म्हशीसाठी गोकुळ मार्फत तीस हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे . या तीस हजार रुपये पैकी मदत म्हणून 5 हजार रुपये अनुदान प्रस्ताव सादर केल्यानंतर तात्काळ देण्यात येईल, असे गोकुळ चे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले आहे. त्यानंतर ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील असे म्हणाले,’ जातिवंत म्हैसविक्री केंद्र मुळे गोकुळच्या दूध उत्पादनात प परराज्यातील जनावरे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी कमी होणार असून खर्चात बचत होण्यास मदत होईल. दूध पदे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.milk subsidy gokul

विक्री केंद्रावर सत्कार करण्यात आला

या कार्यक्रमा वेळी नवीन म्हैस विक्री केंद्रातून म्हैस खरेदी केलेल्या दूध उत्पादक राणी कोंडीराम पोवार, प्रतिमा दूध संस्था ( निटवडे ), बाबासो केरबा दिवसे, नागनाथ दूध संस्था (नागदेववाडी ), बळीराम पांडुरंग साळेखो, पंचगंगा दूध संस्था (आंबेवाडी), नवनाथ केरबा गुडाळे , जखमाई दूध संस्था ( राशिवडे बुद्रुक), हरीश भिकाजी दळवी, धरमीमाई दूध संस्था (गवसे पैकी पाटील वाडी), बाबू व्यंकू कागणकर ,विठ्ठल दूध संस्था (तावरेवाडी) या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

हे वाचा : नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेअंतर्गत मिळणार दहा लाख पर्यंतचे कर्ज

जातिवंत म्हैस विक्री केंद्रवर उपस्थित होते

milk subsidy gokul गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले यांनी प्रस्ताविक केली. मार्गदर्शक एनडीडीबी मुंबईचे जनरल मॅनेजर डॉ. शिवकुमार पाटील यांनी केले. संचालक शशिकांत पाटील _ चुयेकर यांनी आभार व्यक्त केले. संचालक अभिजित तायशेटे ,किसान चौगले ,नंदकुमार ढेंगे , संभाजी पाटील ,प्रकाश पाटील , बयाजी शेळके ,बाळासो खाडे , चेतक नरके , युवराज पाटील ,राजेंद्र मोरे , संचालिका अंजना रेडकर , योगेश गोडबोले , डॉ . उदयकुमार मोगले , पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. साळुंखे उपस्थित होते.

Leave a comment