महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर; 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला! maharashtra election

maharashtra election संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा 15 ऑक्टोंबर वार मंगळवार रोजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. राज्यात विधानसभा निवडणूक ही 20 नोव्हेंबरला होणार आहे आणि सर्व मतदान हे एकाच टप्प्यात होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांच्याकडून कळवण्यात आलेली आहे. आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने महाराष्ट्र मध्ये आणि झाडाकडे मध्ये विधानसभेचे आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.त्यावेळी निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणुका आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू यांच्यासह निवडणूक अधिकारी उपस्थित होते.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

maharashtra election महाराष्ट्र विधानसभेचा कार्यक्रम

26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत असून झाराखंड विधानसभेचे मुदत ही 5 जानेवारी 2025 रोजी संपत आहे. राज्यसह झाराखंड विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक कार्यक्रम या अगोदरच केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. आयोगाने याबद्दल दिलेल्या माहितीनुसार राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. यामुळे आता इथून पुढे राजकीय पक्षाचे दौरे, मेळावे , सभांना अधिकच वेग येईल.

झाराखंड विधानसभेचा कार्यक्रम

केंद्रीय निवडणूक आयोगाने घराकडे येथील निवडणुकीबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम आयोगाने दिलेल्या माहितीनुसार झाराखंडमध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. झाराखंडमध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा हा 13 नोव्हेंबरला होणार असून दुसरा टप्पा 20 नोव्हेंबरला होणार आहे. आणि झारखंड मधील मतमोजणी ही 23 नोव्हेंबरला होईल.


maharashtra election मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती देत असताना असे सांगितले की, आम्ही महाराष्ट्र आणि झाराखंड या राज्यांना भेट दिली होती. त्यानंतर आम्ही तेथील सर्व व्यवस्थेचा अभ्यास केला होता. त्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत 288 जागांवर मतदान होणार असून, त्यातील 234 जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी आहेत आणि एसटी प्रवर्गासाठी 25 तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. तर 1 लाख पोलिंग बूथ असतील. तर राज्यामध्ये एकूण 9.63 कोटी मतदार आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून देण्यात आलेली आहे.

हे वाचा: मुद्रा योजनेतून मिळणार 20 लाख रुपये

झारखंड या राज्यात 24 जिल्हे आहेत आणि 81 जागांवर विधानसभा निवडणूक होणार आहे . यामधील 28 जागा या एसटी प्रवर्ग आणि 9 जागा एस सी प्रवर्गासाठी राखीव आहे असतील. झाराखंड विधानसभेचा कार्यकाल हा 5 जानेवारी रोजी संपणार आहे. झारखंड या राज्यामध्ये 2.6 कोटी मतदार आहे. यामधील 1.29 कोटी महिला आहेत तर, 1.31 कोटी पुरुष मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांनी दिलेली आहे. तसेच 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना त्यांच्या घरी मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. व्होटर हेल्पलाइन अॅपमध्ये त्या व्यक्तींचे मतदान नेमके कुठे होणार नाही याची काळजी घेतली जाईल , अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांच्याकडून देण्यात आलेल्या.

उमेदवारी अर्जाची मदत

maharashtra election निवडणूक आयोगाने ठरवल्याप्रमाणे 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. ज्यामुळे आता उमेदवारांना 29 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे. तर या अर्जाची छाननी 30 ऑक्टोबर पर्यंत होणारा असून 4 नोव्हेंबर पर्यंत ज्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

या ठिकाणी वाजणार पोटनिवडणुकीचा बिगूल

केरळमधील 1 विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघ साठी 13 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.
उत्तराखंडमध्ये पण 1 विधानसभा साठी २० नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 1 लोकसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि नांदेड मतदार संघात देखील पोटनिवडणूक लागणार आहे. या दिवशी नांदेड मतदार संघासाठी खूप निवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे अशी माहिती निवडणूक आयोगाने देण्यात आलेली आहे.

Leave a comment

Close Visit Batmya360