achar sanhita : आचार संहिता म्हणजे नेमके काय?

achar sanhita महाराष्ट्र राज्यामध्ये येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी या मतदानाचे मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे यामुळे महाराष्ट्र राज्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या काही तारखा खाली देण्यात आले आहेत.

  • उमेदवाराला अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोंबर 2024
  • उमेदवाराचे अर्ज पडताळणी तारीख 30 ऑक्टोबर 2024
  • उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2024
  • मतदान दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी
  • मतमोजणी व निकाल 23 नोव्हेंबर 2024.

प्रत्येक वेळी निवडणूक लागली की निवडणुकीची एक प्रक्रिया सक्रिय केली जाते. यासाठी निवडणुकीच्या कार्यक्रमादरम्यान सर्व तारखा आधीच निश्चित केल्या जातात. या तारखा निश्चित झाल्यानंतर ज्या भागात निवडणूक आहेत त्या भागात आदर्श आचारसंहिता (achar sanhita) लावली जाते. आता ही आचारसंहिता नेमकी काय असते ? आणि यामध्ये कोणते नियम असतात याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

achar sanhita आचारसंहिता म्हणजे नेमकं काय

देशातील निवडणुका स्वतंत्र आणि लोकशाही पद्धतीने होण्यासाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडून काही नियमावली जाहीर करण्यात आलेले आहेत या नियमावलीलाच आचारसंहिता (achar sanhita) असे म्हटले जाते.

हे वाचा: मतदान नोंदणी प्रक्रिया


निवडणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व राजकीय पक्ष तसेच सर्व उमेदवार यांनी achar sanhita आदर्श आचारसंहितेचे नियम पाळणे बंधनकारक आहे

  • एखाद्या राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने जर आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाऊ शकते.
  • जर एखाद्या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केला तर त्या उमेदवाराला भविष्यात निवडणूक लढवण्यासाठी मनाई केली जाते गंभीर बाब असल्यास कायदेशीर गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो आणि कायदेशीर शिक्षा देखील होऊ शकते.
  • निवडणूक आयोगाने त्यांच्या सर्व नियम त्यांचे अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केलेले आहेत.
    या नियमांमध्ये राजकीय पक्ष आणि त्यांनी हेमंत दिलेले उमेदवार सर्वसाधारण वर्तन तसेच प्रचार सभा मिरवणुका आणि रॅली काढण्याच्या अटी शर्तीची माहिती दिलेली आहे.
  • आचारसंहिता काळात राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी कोणते कार्य करावे आणि कोणते करू नये याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे मतदान केंद्रावर काय करता येईल आणि काय करता येणार नाही त्यासोबतच सत्ताधारी पक्षाने कशी भूमिका घ्यावी अशा अनेक नियम आचारसंहितेदरम्यान लागू केलेले असतात.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर चे काही महत्वाचे नियम

  • ज्या भागात आचारसंहिता लागू झाली आहे त्या भागातील सत्ताधारी कोणत्याही सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करू शकत नाहीत आणि उद्घाटन भूमिपूजन यासारखे कार्यक्रम देखील करू शकत नाहीत.
  • निवडणुकीच्या प्रचारासाठी सरकारी वाहने सरकारी बंगले किंवा सरकारी वस्तूंचा वापर करू शकत नाही.
  • एकदा राजकीय पक्षाला प्रचार सभा रॅली किंवा मिरवणूक कार्यक्रम घ्यायचा असेल तर स्थानिक पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते.
  • राजकीय पक्ष किंवा त्यांचे उमेदवार मतदारांना धर्म जात किंवा पंथाचे आधारे मतदान करण्याचे आव्हान देखील करू शकत नाहीत.
  • आचारसंहिता दरम्यान जाती धर्मावरून तणाव निर्माण करणारी कोणतीही कृती करता येणार नाही.
    बॅनर पत्रके लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी आवश्यक असते परवानगीशिवाय प्रचार करण्यास परवानगी देण्यात येत नाही.
  • ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी दारूचे दुकाने बंद असतात प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी किंवा मध्ये पैशाची वाटप करण्यास बंदी घालण्यात आलेली असते.
  • मतदानाच्या दिवशी आवश्यक असणारे पक्षाचे बूथ साध्या पद्धतीने उभारावे प्रचार साहित्य किंवा मतदारांना भुरळ घालणारी कोणती गोष्ट असू नये मतदारांसाठी खाण्यापिण्याची सोय नसावी.
    निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आवश्यक आहे.
  • मतदारांना पैसे देणे मतदारांना धमकावून बोगस मतदान करणे मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या आत कोणत्याही प्रकारे प्रचार करणे प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही प्रचार सुरू ठेवणे आणि मतदारांना पुन्हा मतदान केंद्रावर देणे किंवा अन्य त्यांच्या हालचालीची व्यवस्था करणे आचारसंहितेनुसार यापैकी कोणतेही कामे करण्यास मनाई आहे.
  • राजकीय कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोग निरीक्षकांची नेमणूक करतात.

आचारसंहिता कशी सुरू झाली

achar sanhita सण1960 पासून केरळ विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची सुरुवात झाली. सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करून त्यांच्या सहमतीने आचारसंहिता तयार करण्यात आली. कोणते नियम पाळावे हे त्यावेळी पक्ष आणि उमेदवारांनी ठरवले होते. 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 1967 च्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात नवीन गोष्टी आणि आवश्यकतेनुसार नवीन नियमांची भर पडत गेली. achar sanhita आचारसंहितेचे नियम आयपीसी कलमाच्या आधारे लागू केले जातात. ज्या राजकीय पक्षातून किंवा उमेदवार आचारसंहितेच्या नियमांचे पालन केले जात नाही त्यावेळी निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राजकीय पक्ष वर किंवा त्यांच्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई देखील केली जाते.

Leave a comment

Close Visit Batmya360