शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदानावर टोकन यंत्र; अर्ज सुरू येथे करा अर्ज.

महाडीबीटी शेतकरी योजनेच्या माध्यमातून टोकन यंत्र अनुदान

शेतकऱ्यांसाठी सरकार टोकन यंत्र खरेदी साठी पन्नास टक्के अनुदान देत असून, त्याद्वारे शेतकरी टोकन मशिन खरेदी करू शकतात. ज्या अर्जदाराला टोकन मशिन खरेदी करायचे आहे, त्याला एकूण रकमेच्या पन्नास टक्के रक्कम अनुदान म्हणून मिळते, ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी महाडीबीटी शेतकरी योजनेच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी करणे अवश्यक आहे . अर्ज करण्याविषयीची ही सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करा

अर्ज करण्यासाठी महाडीबीटी शेतकरी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल. या लॉगिनमध्ये त्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड किंवा ओटीपी किंवा आधार बायोमेट्रिक्स चा उपयोग करून लॉगिन करता येईल. लॉगिन केल्यानंतर त्यांचे प्रोफाईल १०० टक्के भरून घेणे अवश्यक आहे. (आपण या आधी कोणत्याही घटकसाठी अर्ज केला असेल तर आपली प्रोफाइल आधीच पूर्ण भरलेली असेल)

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
ladki bahin yojana july installment जुलै महिन्याचा ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता जमा ; रक्षाबंधनापूर्वी महिलांना मिळाली भेट. ladki bahin yojana july installment

अर्ज कसा करायचा?

लॉगिन केल्यानंतर अर्ज करा हा पर्याय दिसेल ‘अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर “कृषी यांत्रिकीकरण” हा घटक निवडा. या योजनेत विविध कृषी यंत्रांशी संबंधित योजना आहेत. “घटक निवडा” या पर्यायावर क्लिक करा, ज्यामध्ये निवडली जाणारी मुख्य घटक “कृषी अवजारे खरेदीसाठी अर्थसाहाय्य ” निवडून घ्यायचे आहे.

अवश्यक असणाऱ्या टोकन यंत्र पर्याय निवडणे

या मध्ये आपल्याला मानवचलीत यंत्र आणि बैलचलीत यंत्र असे पर्याय दिसतील आपल्याला जे यंत्र हवे असेल त्या यंत्रासाठी आपल्याला अर्ज करावा लागेल. आपल्याला बैल चलित यंत्र किंवा मानवचलीत यंत्र निवडून घ्यावे लागेल. त्या नंतर उपकरण मध्ये टोकन यंत्र हा पर्याय निवडावा लागेल.

शेतकऱ्यांसाठी महाडीबीटीवर टोकन यंत्रासाठी अर्ज प्रक्रिया: टोकन यंत्रासाठी अर्ज करताना हे लक्षात ठेवा

मनुष्य चलित टोकन यंत्र अर्ज प्रक्रिया

महाडीबीटीवर मानव चलित टोकन यंत्र साठी अर्ज करताना “मशीन पूर्वसंमतीशिवाय उपकरणे खरेदी करणार नाही” हे तपासणे आवश्यक आहे आणि त्यानंतर “सेव्ह” पर्यायावर क्लिक करणे आवश्यक आहे. नंतर, आपल्याला इतर वस्तू निवडण्याची आवश्यकता असल्यास “होय” आणि आपल्याला आवश्यकता नसल्यास “नाही” निवडा. त्यानंतर “नाही” निवडणल्यास आपल्याला आपला घटक जतन झाला असा संदेश मिळेल.

हे पण वाचा:
Farm Road Model Farm Road Model: शेतात जायला आता मिळणार हक्काचा रस्ता, राज्यभर ‘औसा पॅटर्न’ लागू होणार

अर्ज करण्याची प्रक्रिया

सेव्ह केल्यानंतर अर्ज सबमिट करण्यासाठी ‘सबमिट अॅप्लिकेशन’ या पर्यायावर क्लिक करा. इतर वस्तू निवडायच्या असतील तर मुख्य मेन्यूवर जा. अर्ज सादर करण्यापूर्वी 1, 2, 3, 4 इत्यादी प्राधान्य क्रम निवडा. आपल्या आवडीनुसार आपल्या वस्तूंना प्राधान्य द्या. योजनेच्या अटी व शर्ती स्वीकारा आणि “अर्ज सबमिट करा” वर क्लिक करा.

हे वाचा: महाडीबीटी शेतकरी योजना

हे पण वाचा:
SBI Home Loan SBI Home Loan: गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ₹10 लाखांच्या कर्जासाठी किती पगार आवश्यक? जाणून घ्या सविस्तर

अर्ज सादर करताना शुल्क भरणा प्रक्रिया

चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी अर्ज केल्यास २३.६० रुपये भरण्याची गरज नाही(या आधी महाडीबीटी वर अर्ज केला असल्यास शुल्क भरण्याची आवश्यकता नाही). परंतु जर हा पहिला अर्ज असेल तर तो पेमेंट पेजवर रिडायरेक्ट केला जाईल, जिथे नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, यूपीआय इत्यादीद्वारे ₹ 23.60 भरावे लागतील. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल आणि अर्ज यशस्वीरित्या सबमिट होईल.

महाडीबीटीवर टोकन मशिनसाठी अर्ज प्रक्रिया : लॉटरीपासून कागदपत्रे अपलोड करण्यापर्यंत सर्व माहिती

लॉटरी आधारे निवड कशी होते व निवड झाल्यानंतर पुढील प्रक्रिया कशी करावी

शेतकऱ्याने अर्ज करून महाडीबीटीवर टोकन यंत्रासाठी पैसे भरल्यानंतर त्यांचा अर्ज “प्रलंबित अर्ज” टॅबखाली दिसेल.अर्जावर “लॉटरीसाठी पात्र” असे स्टेटस दर्शवले जाईल. लॉटरी काढल्यानंतर अर्जदाराचा विजेता म्हणून उल्लेख करून निवड घोषित केली जाईल. याच पोर्टल वर निवड झालेल्या लाभार्थी याची यादी देखील प्रसिद्ध करण्यात येईल.

हे पण वाचा:
Sheli Palan: राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत शेळीपालनासाठी 10 लाख रुपये अनुदान, असा करा अर्ज…!

निवडीनंतर आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया अपलोड करा

लॉटरी लागल्यानंतर शेतकऱ्यांना काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतात. यामध्ये टोकन यंत्र टेस्ट रिपोर्ट, टोकन यंत्र कोटेशन, शेतकार्याचे सातबारा , बँक पासबुक आदींचा समावेश आहे. त्यानंतर डिव्हाइस खरेदी करून त्याचे बिल अपलोड करावे लागते. बिल अपलोड केल्यानंतर कृषि अधिकारी यांच्याकडून यंत्र खरेदी केल्याची तपासणी केली जाते. कृषि सहायक यांनी तपासणी केल्यानंतर शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गत अनुदान वितरित केले जाते.

Leave a comment