farmer unique id card शेतकरी युनिक आयडी कार्ड शेतकऱ्यांना काय होणार फायदा.

farmer unique id card : केंद्र सरकारकडून देशातील सर्व शेतकऱ्यांना एक युनिक आयडी कार्ड दिले जाणार आहे. नवीन तयार केले जाणारे युनिक आयडी कार्ड चा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार; त्यासोबतच युनिक आयडी कार्ड मुळे शेतकऱ्यांना कोणते लाभ होतील हे प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात पडलेले आहेत. युनिक आयडी कार्ड म्हणजे नेमके काय याबद्दलची संपूर्ण माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

farmer unique id card युनिक आयडी कार्ड म्हणजे आधार कार्ड प्रमाणे एक नवीन कार्ड असेल. युनिक आयडी मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या संबंधित असणाऱ्या सर्व घटकांची माहिती जसे की सातबारा, आठ अ, जमिनीचा नकाशा, पीक नुकसान अनुदान, शेतकऱ्यांच्या पिकांच्या संबंधित माहिती, पिक विमा योजना, खतावरील अनुदान, पी एम किसान लाभार्थी स्टेटस या व अश्या सर्व घटकांची माहिती एकाच कार्डच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हे युनिक आयडी कार्ड वाटप केले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतीचे डिजीटायलेशन केले जाणार आहे.

farmer unique id card शेतकऱ्यांचा काय होणार फायदा

farmer unique id card बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात हा विचार येतो की या युनिक कार्ड चा शेतकऱ्यांना काय फायदा होणार. युनिक आयडी कार्ड चे काय फायदे होणार हे पाहुयात. अगदी सोप्या शब्दात सांगायच झाल तर शेतकऱ्यांची सर्व माहिती एक क्लिक वर आणण्याचा प्रयत्न सारकर करणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ration Card e-KYC Ration Card e-KYC :घरी बसल्या रेशन कार्ड E-KYC कशी करायची ? पहा सविस्तर

शेतकरी योजनांचा लाभ केंद्र सरकार किंवा राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवतात. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांनी शेतकऱ्यांसाठी कोणतीही योजना राबवली की शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी सर्व कागदपत्रे जमा करणे आवश्यक असते. यातच शेतकऱ्यांची बऱ्याच वेळा कागदपत्र जमा करण्यात विलंब होतो. आता या युनिक आयडी कार्ड च्या माध्यमातून शेतकऱ्यांना या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही.

हे वाचा: ॲग्री स्टॅक योजना शेतीचे होणार डिजिटलीकरण

एक क्लिक वर सर्व माहिती या युनिक आयडी कार्ड च्या माध्यमातून शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे एकमेकांसोबत लिंक केलेले असतील. त्यामधून शेतकऱ्यांचा युनिक आयडी कार्ड नंबर एंटर केल्यानंतर शेतकऱ्यांचा संपूर्ण तपशील त्या ठिकाणी दर्शवला जाईल. ज्यामध्ये शेतकऱ्याचे खाते क्रमांक, गट क्रमांक, क्षेत्र , शेतकऱ्यांनी घेतलेले पीक, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक या पद्धतीची सर्व माहिती एकाच युनिक आयडी कार्ड च्या माध्यमातून प्रदर्शित होऊन शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा तात्काळ लाभ देणे शक्य होईल.

हे पण वाचा:
PM Kisan Installment Date PM Kisan Installment Date: पीएम किसानचा 20 वा हप्ता या दिवशी होणार जमा; तारीख जाहीर

हमीभावाने पिकांची विक्री युनिक आयडी कार्ड च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांचा तपशील यामध्ये जोडला जाईल. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचे पीक हमीभावाने विक्री करण्याकरता कोणत्याही प्रकारची नोंदणी करणे आवश्यक राहणार नाही. किंवा युनिक आयडी कार्ड च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहज नोंदणी करता येणार. आपल्या पिकाची सहज विक्री करता येणार आहे. त्यासोबतच युनिक आयडी कार्ड च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण विकलेल्या पिकाचे आर्थिक लाभ याची स्थिती देखील पाहता येणार.पीक विक्री कारणासाठी शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांची आवश्यकता राहणार नाही.

आर्थिक लाभ स्थिति राज्य शासन किंवा केंद्रशासन यांच्याकडून शेतकऱ्यांना विविध आर्थिक लाभ वितरित केले जातात. या आर्थिक लाभांची स्थिती पाहण्यासाठी देखील या युनिक आयडी कार्ड च्या माध्यमातून सहज व सोपे होणार आहे. त्यासोबतच पिक विमा योजना असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल या सर्व घटकांची स्थिती देखील या युनिक आयडी कार्ड च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहज एका क्लिकवर पाहता येणार आहे.

क्षेत्र नकाशा एक क्लिक वर शेतकऱ्यांना वितरित केले जाणाऱ्या (farmer unique id card) युनिक आयडी कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे क्षेत्र त्यासोबतच जमिनीच्या नकाशा या सर्व घटकांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. एक क्लिक वर माहिती प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया या युनिक आयडी कार्ड च्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. ज्यामधून शेतकऱ्यांचे क्षेत्र व मिळणारा लाभ याची अचूक व वेळेवर माहिती शासनापर्यंत सहज मिळू शकेल.

हे पण वाचा:
PM Kisan Mandhan Yojana PM Kisan Mandhan Yojana :या योजने मधून शेतकऱ्यांना मिळणार दर महिन्याला 3000 रुपये ,असा घ्या लाभ..!

युनिक आयडी कार्ड कसे काढावे.

farmer unique id card युनिक आयडी कडण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करून आपले युनिक आयडी कार्ड ऑनलाइन पद्धतीने तयार करू शकता. ऑनलाइन पद्धतीने आपले युनिक आयडी कार्ड कसे काढावे या बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा.

farmer unique id card युनिक आयडी कार्ड या संकेतस्थळावर जावे लागेल. या साठी लिंक वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

हे पण वाचा:
PM Kisan PM Kisan :शेतकऱ्यांनो, अनोळखी लिंक्स आणि मेसेज पासून सावधान..!पीएम किसानचा 20 वा हप्ता जारी करण्यापूर्वी सरकारचा महत्त्वाचा इशारा

Leave a comment