sour pump farmer payment : राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आठ लाख सौर कृषी पंप वाटप केले जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज देखील केले आहेत. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी कोणत्या शेतकऱ्याने किती पेमेंट करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
हे वाचा: मागेल त्याला सौर कृषि पंप योजना, पेमेंट करावे का?
कोणत्या शेतकऱ्यांना किती हिस्सा भरावा लागेल.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत सर्वसाधारण शेतकऱ्यांना एकूण सौर पंप किमतीच्या 10 टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. तर अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना एकूण रकमेच्या 05 टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना किती रक्कम भरावी लागेल. sour pump farmer payment
सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना
- तीन एचपी पंप साठी 22971 रुपये भरावे लागतील
- पाच एचपी पंप साठी 32075 रुपये भरावे लागतील
- साडेसात एचपी साठी 44929 रुपये भरावे लागतील
अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना किती रक्कम भरावी लागेल
अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना
- 11486 रुपये तीन एचपी पंपासाठी .
- 16038 रुपये पाच एचपी पंपासाठी.
- 22465 रुपये साडेसातशे पंपासाठी भरावे लागतात.
सौर पंप ची मूळ किंमत
- 3 एचपी पंप मूळ किंमत 201850 .
- 5 एचपी पंप मूल किंमत 281850.
- 7.5 एचपी पंप मुळ किमत 394800.
शेतकरी हिस्सा रक्कम व जीएसटी sour pump farmer payment
शेतकऱ्यांना आपला हिस्सा सर्वसाधारण शेतकऱ्यांना मूळ किमतीच्या 10 टक्के भरावा लागेल. अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना मूळ किमतीच्या 5 टक्के रक्कम भरावी लागेल. शेतकरी हिस्सा रकमेवर शेतकऱ्यांना जीएसटी लावली जाते. मूळ किंमत आणि लागणारी जीएसटी मिळून शेतकऱ्यांना भरावी लागणारी रक्कम ही वरील प्रमाणे असेल.