Vishwakarma loan केंद्र सरकार ने देशातील असंघटित कामगारांना प्रोस्थाहन देण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील कारागिरांना कोणत्याही हमीशिवाय कमी व्याजदरात कर्ज देते. याशिवाय या कारागिरांना टूलकिट इन्सेंटिव्ह, मार्केटिंग सहाय्य आणि डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन या स्वरूपातही पाठिंबा मिळतो. सुतार, गवंडी आणि शिंपी यांसारख्या कारागीर आणि कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली पंतप्रधान विश्वकर्मा योजना वेगाने प्रगती करत आहे.
सरकार 8 टक्के व्याजावर सबसिडी देते
पीएम विश्वरकर्मा या योजनेअंतर्गत,देशातील सुमारे 10 लाख लोकांना त्यांच्या व्यवसायासाठी वाढीसाठी व आधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी ई-व्हाऊचरद्वारे 15,000 रुपयांपर्यंतचे टूलकिट प्रोत्साहन दिले आहे. कर्जावरील व्याजदर 5 टक्के असून, त्यावर सरकार अनुदान देते. भारत सरकार 8 टक्के व्याज अनुदान देते, ज्यामुळे एकूण कर्जाची किंमत कमी होते.ज्या मुळे लाभार्थी यांना 3 टक्के व्याजदर सवलत स्वरूपात मिळते. घेतलेल्या कर्जावर लाभार्थी यांना 5 टक्के व्याजदर अकरले जाते. पीएम विश्वकर्मा योजना गेल्या वर्षी 17 सप्टेंबरला 2023 रोजी सुरू झाली आहे.
हे वाचा: विश्वकर्मा योजना पात्रता व अर्ज प्रक्रिया.
Vishwakarma loan या योजनेचा उद्देश
- विविध 18 व्यवसायातील कारागीरांना त्यांच्या हातांनी आणि साधनांनी काम करण्यासाठी सहाय्य प्रदान केले जात आहे.
- पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत, कारागीरांच्या पारंपारिक कौशल्यांचे अपग्रेड आणि आधुनिकीकरण करण्यासाठी देशातील 26 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये मूलभूत कौशल्य प्रशिक्षणाच्या स्वरूपात औपचारिक प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.
- योजनेअंतर्गत पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र, कौशल्य अपग्रेडेशन, टूलकिट प्रोत्साहन, कर्ज सहाय्य, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन इत्यादि सहाय्य प्रदान केले जाते.
- प्रशिक्षण दरम्यान लाभार्थी यांना प्रती दिवस 500 रुपये एवढा मोबदला दिला जातो.
कर्ज कसे मिळते.Vishwakarma loan
या योजनेत अर्ज केल्यानंतर आपल्याला प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर लाभार्थी यांना पहिल्या टप्यात 1 लाख रुपये कर्ज वितरित केले जाते. पहिले घेतलेले 1 लाख रुपये कर्ज परतफेड केल्या नंतर. दुसऱ्या टप्प्यात अर्जदारला 2 लाख रुपयेएवढे कर्ज वितरित केले जाते.