Swadhar Yojana 2024 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती आणि नव बौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबविली आहे. वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या परंतु शैक्षणिक गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक सहाय्य पुरवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे. अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 अर्ज नुतनीकरण्यासाठी मुदत मिळाली आहे.
2024-25 या शैक्षणिक वर्षात शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार लाभ घेण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश करायचा आहे त्यांनी या पोर्टलवर आपली कागदपत्रे अपलोड करावी. या योजनेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी स्वाधार योजनेचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज समाज कल्याण कार्यालयात भरलेला आहे, असे विद्यार्थी 2024-25 या कालावधीतून नूतनीकरणासाठी पात्र होतात.
Swadhar Yojana 2024 स्वाधार योजनेची उद्दिष्टे
- या योजनेचे उद्दिष्टे शेतकऱ्यांच्या आणि वंचित घटकांतील मुलांना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे.
- शासकीय वस्तीगृहासाठी पात्र असूनही जागा अभावी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आणि शिक्षणासाठी सहाय्य करणे असे या योजनेचे उद्दिष्टे आहे .
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार उपलब्ध करून देणे.
हे वाचा : मागेल त्याला सौर कृषी पंप योजना: साठी पेमेंट करावे का? पहा सविस्तर माहिती .
Swadhar Yojana 2024 अर्जाची प्रक्रिया
- 2024-25 शैक्षणिक वर्षात योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
- मागील वर्षी ऑफलाईन अर्ज केलेले विद्यार्थी तसेच चालू वर्षात नवीन व नूतनीकरणास पात्र आहेत.
- यासाठी Existing Swadhar Service या टॅबद्वारे अर्ज करणे शक्य आहे.
Swadhar Yojana 2024 महत्त्वाची कागदपत्रे
- मागील वर्षाचा स्वाधार योजनेचा अर्ज.
- शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्रवेश संबंधित माहिती.
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे.
Swadhar Yojana 2024 अर्ज करण्याची अंतिम मुदत आणि सूचना
- विद्यार्थ्यांनी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज पूर्ण करावा.
- ऑनलाईन अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे सादर करावी. असे आवाहल हिंगोली येथे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
Swadhar Yojana 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे 2024-25 मधील नवीन व नुतनीकरणाचे अर्ज https://syn.mahasamajkalyan.in/Homelogin.aspx?ReturnUrl=%2f या पोर्टलवर भरणे आवश्यक आहे .
- नूतनीकरणाचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी न्यू ऐवजी एक्झिस्टींग या टॅब वर क्लिक करून स्वाध्याय सर्व्हिस हा पर्याय निवडावा व इयत्ता 11 वी,प्रथम वर्षासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यू टॅब वर क्लिक करून स्वाधार पर्याय निवड करून अर्ज करणे आवश्यक आहे.
Swadhar Yojana 2024 विद्यार्थ्यांना या योजनेचा असा मिळेल लाभ
- स्वाधार योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल तसेच ऑनलाईन अर्ज करणे पण आवश्यक आहे.
- स्वाधार योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थी स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत.
- या योजनेच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 51 हजार रुपये दिले जातील
Swadhar Yojana 2024
शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी स्वाधार योजना मोठा आधार ठरत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रियेत विलंब न करता आवश्यक ती पावले उचलून या योजनेचा लाभ घ्यावा. शिक्षणासाठी ही सुवर्णसंधी नक्की साधा !