MAHA DBT शिष्यवृत्ती अर्ज : राज्यातील उच्च शिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी MAHA DBT पोर्टलच्या माध्यमातून 14 शिष्यवृत्ती योजना राबवल्या जात आहेत. मात्र, प्रवेशित विद्यार्थ्यांच्या तुलनेत फारच कमी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. यामुळे 25 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहिम राबवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
MAHA DBT शिष्यवृत्ती अर्ज विशेष मोहिमेचा उद्देश
शिष्यवृत्ती अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी MAHA DBT पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सुलभतेने भरता यावा यासाठी विविध विद्यापीठे व महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याच्या अशा सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आले आहेत.
कोणती महाविद्यालये सहभागी होतील?
या मोहिमेत सहभागी होणारी महाविद्यालये व विद्यापीठे:
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
- डेक्कन कॉलेज
- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
- एसएनडीटी विद्यापीठ
- गोखले इन्स्टिट्यूट
- कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ
याशिवाय, अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संस्थांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरून घेण्यासाठी विशेष मोहीम राबवावे, असे आदेश देण्यात आले आहेत.या विशेष मोहिमेत सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत.
हे वाचा: मागेल त्याला सौर कृषी पंप तुमला पेमेंट ऑप्शन आले,मग पेमेंट करावे का
महाविद्यालयांना दिलेल्या सूचन
शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी,या उद्देशाने महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्याव्यात,तसेच शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे.
- विद्यार्थ्यांना संगणक व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
- विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहन व मदत करावी.
- महाविद्यालयांनी विशेष सप्ताहात झालेल्या कार्यवाहीचा अहवाल उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर करावा.
MAHA DBT शिष्यवृत्ती अर्ज शिक्षण विभागाची भूमिका
सर्व महाविद्यालय व संस्था आणि विद्यापीठ यांनी महाडीबीटी पोर्टलवर विशेष मोहीमे अंतर्गत राबविण्यात आलेल्या सप्ताहाच्या अनुषंगाने कार्यवाहीचा अहवाल उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर करावा, अशा सूचना पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.अशोक उबाळ यांनी दिल्या आहेत. त्यामुळे सर्व महाविद्यालयांना येत्या 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती अर्ज भरून घेण्यासाठी विशेष सप्ताहाचे आयोजन करावे लागणार आहे. शिष्यवृत्ती अर्ज संख्येत वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच, वेळोवेळी परिपत्रक व ऑनलाइन बैठका आयोजित करून महाविद्यालयांना मार्गदर्शन केले जात आहे.
MAHA DBT शिष्यवृत्ती अर्ज विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
महाडीबीटी शिष्यवृत्ती योजनांमुळे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळवू शकतात. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी वेळेवर अर्ज भरून योजनांचा लाभ घ्यावा.
तारीख लक्षात ठेवा: 25 ते 30 नोव्हेंबर 2024
विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. MAHA DBT शिष्यवृत्ती अर्ज.