Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : सौर ऊर्जा ही पर्यावरणपूरक आणि स्वस्त ऊर्जा स्त्रोत आहे .शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सुविधा लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने 2015 पासून सौर कृषी पंप योजनांचा प्रारंभ केला आहे . अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबवण्यात आल्या होत्या. तसेच सध्या परिस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक – ब योजनेद्वारे सौर कृषी पंप बसवले जात आहेत. राज्यात दिनांक 6 – 9-2024 रोजी पर्यंत 2,63,156 पंप बसवले गेले असून, शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता “मागेल त्याला सौर कृषी पंप” योजना राबवण्यात आली आहे.
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana पेमेंट पर्याय उपलब्ध
तर गेल्या दोन महिन्यांत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले होते. आता या अर्जांसाठी पेमेंट पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. तर आपण खालील पद्धतीने आपले पेमेंट ऑप्शन आले की नाही हे चेक करून शकतात.
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana एवढी रक्कम भरावी लागेल
- 3 HP साठी: ₹22,971/-
- 5 HP साठी: ₹32,075/-
- 7.5 HP साठी: ₹44929/-
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana पेमेंट ऑप्शन आले का …. …असे करा चेक ?
- सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती भेट द्यावी लागेल.
- https://krishivibhag.com/magel-tyala-saur-krushi-pump-yojana-payment/
- त्यानंतर पुढील स्किन वरती तुम्हाला मागेल त्याला सौर साठी केलेल्या अर्ज क्रमांक एम के आयडी (MK ID) टाका आणि सर्च या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला आपल्या अर्ज तपशील आणि पंप तपशील दिसेल व खालील Proceed To Payment हा पर्याय दिसेल.
- Proceed To Payment वर क्लिक करावे आणि त्यानंतर Pay Now वर क्लिक करून आपण UPI/DEBIT CARD द्वारे आपले पेमेंट करू शकतात.
- पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज तपासला जाईल आणि Vendor Selection चा पर्याय येईल व पुढे तुमला पंप स्थापित करून मिळेल.
महत्त्वाची माहिती आणि सूचना
- अर्जाची छाननी करताना सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे सादर केली असणे आवश्यक आहे.
- सातबारा उताऱ्यावर विहीर किंवा बोअरवेलची नोंद असणे आवश्यक आहे.
- सामायिक पाण्याचा स्त्रोत असल्यास “ना हरकत प्रमाणपत्र” अपलोड करावे.
- अपूर्ण अर्ज असल्यास पेमेंट करू नका, अन्यथा रक्कम परत मिळण्यास विलंब होऊ शकतो.त्यामुळे ज्यांना केलेल्या अर्जांबाबत खात्री आहे त्यांनी पेमेंट करावे.
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana ऑनलाइन अर्ज कसा कराल?
या योजनेअंतर्गत नवीन सौर कृषी पंप मिळवण्याकरिता महावितरणाच्या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन A-1 अर्ज भरावा लागतो, अर्ज करण्या साठी महावितरणातर्फे स्वतंत्र्य वेब पोर्टल निर्माण करण्यात आले आहे . अर्जासोबत आधार कार्ड, सातबारा उतारा, उत्पन्न प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महावितरण पोर्टल लिंक : येथे क्लिक करा.
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana सौर कृषी पंपाचा लाभ
सौर कृषी पंपामुळे शेतकऱ्यांना सतत वीजपुरवठ्याची चिंता कमी होते. हे पंप पर्यावरणपूरक असून, शेतकऱ्यांना दीर्घकालीन ऊर्जा बचत लाभ मिळवून देतात.
निर्णय विचारपूर्वक घ्या
जर अर्ज पूर्ण असेल आणि आवश्यक कागदपत्रे सबमिट केलेली असतील, तरच पेमेंट करा. सौर कृषी पंपाने शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले असून, “मागेल त्याला सौर कृषी पंप” योजना स्वावलंबी शेतीसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरते.
3 thoughts on “मागेल त्याला सौर कृषी पंप तुमला पेमेंट ऑप्शन आले,मग पेमेंट करावे का?Magel Tyala Saur Krushi Pump Yojana.”