Election Result Online Maharashtra मागील दीड ते दोन महिन्यापासून राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुमाकूळ सुरू आहे. यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रिया मध्ये 65.11 टक्के मतदान झाले आहे. याचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. परंतु बऱ्याच नागरिकांना हा निकाल कसा पाहावा कोणत्या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला किती मतदान पडले याबद्दलची सर्व माहिती कशी तपासावी याची संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.
Election Result Online Maharashtra मोबाईल अँप च्या माध्यमातून निकाल कसा पाहावा.
- प्ले स्टोअर आपल्याला वोटर हेल्पलाइन हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे.
- ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड विचारला जाईल त्याच ठिकाणी खाली स्किप लॉगिन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- यानंतर आपल्यासमोर नवीन टॅब ओपन होईल यामध्ये आपल्याला इलेक्शन रिझल्ट हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा.
- त्यानंतर जनरल एलेक्शन टू असेंबली कन्सिस्टंट हा पर्याय दिसेल यावर क्लिक करा.
- या ठिकाणी तुम्हाला सर्वच पक्षाचे उमेदवार यादी दिसेल.
- तुम्हाला हव्या असणाऱ्या तुमच्या मतदारसंघातील उमेदवारांची माहिती पाहण्यासाठी वरती दिलेल्या ड्रॉप डाऊन मेनू मधून तुमचा मतदारसंघ निवडून घ्यावा लागेल.
- तुमचा मतदारसंघ निवडल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या मतदारसंघात उभे असलेले सर्व उमेदवार दिसतील त्यानुसार त्यांना पडलेली मते आणि विजय ठरलेला उमेदवार याची माहिती आपल्यासमोर प्रसिद्ध होईल.
Election Result Online Maharashtra वेबसाइट च्या माध्यमातून निकाल पाहणे.
- सर्वप्रथम आपल्याला https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/index.htm या संकेतस्थळवर जावे लागेल.
- संकेतस्थळवर गेल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्य हा पर्याय निवडावा लागेल.
- त्या नंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे आपल्या समोर दिसेल.
- आपल्या आपल्या मंतदात संघात कोण निवडून आले हे पहायचे असेल तर आपला मतदार संघ निवडावा लागेल.
- आपला मतदार संघ निवडल्यानंतर आपल्या मतदार संघातील सर्व उमेदवार या ठिकाणी प्रसिद्ध होतील.
- या मध्ये विजयी झालेला उमेदवार आपल्याला दिसेल.
- विजयी उमेदवारा सोबतच कोणत्या उमेदवाराला किती मतदान पडले याची माहिती देखील आपल्याला दिसेल.
1 thought on “Election Result Online Maharashtra : असा पहा ऑनलाइन पद्धतीने विधानसभा निकाल.”