E-Peek Pahani : शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार तयार करण्यात आलेले नवीन ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅप मध्ये उपलब्ध आहे . रब्बी हंगामासाठी १ डिसेंबर २०२४ पासून महाराष्ट्रात लागू करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्याना १००% पीक पाहणी डिजिटल स्वरूपात करण्यात येणार आहे . शेतकरी स्वतः त्यांच्या शेतातील पिकांची नोंद या अॅपद्वारे करू शकतात, तसेच हंगामाच्या पहिल्या दिवसापासून सहाय्यकांच्या मदतीने नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हे वाचा : शेतकऱ्यांसाठी 75% अनुदानावर खरेदी मोटर पंप अनुदान योजना .
E-Peek Pahani ई-पीक पाहणी DCS अॅपद्वारे नोंदणीची प्रक्रिया
१. अॅप डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा:
- Google Play Store उघडा आणि E-Pik Pahani (DCS) अॅप डाउनलोड करा.
- अॅप इन्स्टॉल करून उघडा.
२. परवानग्या द्या:
- अॅप उघडल्यावर तुम्हाला फोटो आणि मीडिया अॅक्सेस साठी परवानगी विचारेल. त्यासाठी Allow वर क्लिक करा.
- नंतर लोकेशन परवानगी मागेल. त्यासाठी While Using This App निवडा.
- फोटो आणि व्हिडिओ परवानगी साठी देखील Allow किंवा While Using This App वर क्लिक करा.
३. विभाग आणि गाव निवडा:
- यानंतर पुढील पेजवर तुमचा विभाग निवडा आणि Right Arrow वर क्लिक करा.
- लॉगिन पद्धतीने निवडताना शेतकरी म्हणून लॉगिन करा या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाकून घ्या आणि पुढे जा या बटणावर क्लिक करा.
- तुमचा जिल्हा, तालुका, व गाव निवडा आणि Right Arrow वर क्लिक करा.
४. E-Peek Pahani खाते शोधा:
- तुमचे खाते क्रमांक, गट क्रमांक किंवा नाव टाकून शोधा आणि खातेदार निवडा.
५. पीक माहिती नोंदवा:
- पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या शेतातील पिकांची संपूर्ण माहिती भरून घ्या .
- जीपीएस लोकेशनसह पिकांचे दोन फोटो अॅपद्वारे अपलोड करा.
६. माहिती सबमिट करा:
- भरलेली माहिती तपासा आणि सबमिट करा.
- नोंदणी यशस्वी झाल्यानंतर पुष्टी संदेश मिळेल.
E-Peek Pahani अॅपमधील नवीण बदल
- पीक पाहणीसाठी गट क्रमांकाच्या ५० मीटर आत फोटो घेणे अनिवार्य आहे.
- प्रत्येक शेताच्या दोन फोटो घेणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक गावात सहाय्यकांची नेमणूक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या सूचना
- माहिती अचूक आणि अद्ययावत भरा.
- जीपीएस लोकेशन चुकीचे असल्यास नोंदणी रद्द होऊ शकते.
- फोटो काढताना शेताचे संपूर्ण दृश्य स्पष्ट दिसेल याची खात्री करा.
अधिक माहितीसाठी
- आपल्या तालुका कृषी अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधा.
- अॅपवरील तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी सहाय्यकांची मदत घ्या.
ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपद्वारे पीक नोंदणी प्रक्रिया सुलभ झाली असून, शेतकऱ्यांना जलद आणि अचूक माहिती या अॅपद्वारे नोंदवता येईल.
1 thought on “E-Peek Pahani : नवीन ई- पीक पाहणी DCS मोबाईल ॲपमध्ये कशी करायची,याबद्दल सविस्तर माहिती पहा.”