Ladki Baheen Yojana :मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत  लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, डिसेंबरच्या हप्त्या बाबत मोठी अपडेट .

Ladki Baheen Yojana : 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा सायंकाळी 5.30 वाजता पार पडला, या शपथविधी सोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली .या बैठकीमध्ये कोणकोणती मोठी निर्णय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद पार पाडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. फडणवीस असे म्हणाले की, जरी आमची पद बदलली असली तरी देखील काम करण्याची दिशा बदलणार नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस नंतर लगेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषद मध्ये बोलताना एकने शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिलेली आहे.

Ladki Baheen Yojana चा लाभ सुरूच राहणार

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या Ladki Baheen Yojana महिलांसाठी एक महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला पात्र महिलांच्या बँक खात्यात ₹1500 जमा केले जातात.

  • (Ladki Baheen Yojana) जुलै २०२४ पासून या योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे.
  • नोव्हेंबरपर्यंतचा हफ्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात आधीच जमा करण्यात आला आहे.
  • डिसेंबरच्या हफ्त्याबाबत निर्णय घेताना  तातडीनं डिसेंबरचा हाफता हा लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे अशा सूचना आम्ही केल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

कामाची दिशा कायमच पुढे नेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, जरी त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल झाला असला तरी काम करण्याची दिशा कायम राहणार आहे. “आम्ही घेतलेले निर्णय कागदावरच न राहता त्याची अंमलबजावणीही तात्काळ होईल,” असे ते म्हणाले.

हे वाचा: लाडकी बहीण योजना लवकरच नवीन नियमात बदल

एकनाथ शिंदेंचे वक्तव्य

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘डेडिकेटेड कॉमन मॅन’ (DCM) म्हणून काम करण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले की, “आम्ही जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय वेळेत पूर्ण करणार आहोत. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता लवकरच खात्यात जमा होईल.”

महिलांसाठी आश्वासक बातमी

लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना आर्थिक आधार देण्याच्या सरकारच्या या पावलामुळे महिलांमध्ये सकारात्मक प्रतिसाद आहे. डिसेंबरच्या हफ्त्याच्या रक्कमेत कोणतीही अडचण येणार नाही, याची जबाबदारी सरकारने घेतली आहे.

महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ‘लाडकी बहीण योजना’ पुढील काळातही महिला लाभार्थ्यांसाठी महत्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे.Ladki Baheen Yojana

2 thoughts on “Ladki Baheen Yojana :मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत  लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, डिसेंबरच्या हप्त्या बाबत मोठी अपडेट .”

Leave a comment