Bandhkam Kamgar Yojana: बांधकाम कामगार योजनेचा अर्ज मंजूर की पेंडिंग? पहा सविस्तर.

Bandhkam Kamgar Yojana : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांसाठी ‘बांधकाम कामगार योजना’ पुन्हा सक्रिय केली आहे. या योजनेंतर्गत कामगारांना आर्थिक सहाय्य आणि विविध लाभ मिळण्याची संधी आहे. अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज प्रक्रियेसाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अनेक बांधकाम कामगारांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे . त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात काही काळ( Bandhkam Kamgar Yojana)योजनेवर अंमलबजावणी थांबली होती.आता योजना पुन्हा सुरू करण्यात येत असून प्रलंबित अर्जांची प्रक्रिया जलदगतीने करण्याची शक्यता आहे . त्यामुळे तुम्ही सादर केलेला अर्ज मंजूर झाला की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे . तर आज आपण या लेखामध्ये बांधकाम कामगार योजनेचा अर्ज मंजूर झाला की नाही हे कसे तपासायचे याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Bandhkam Kamgar Yojana कोणासाठी?

  • ही योजना मुख्यतः इमारत बांधकाम आणि इतर बांधकाम कामगारांसाठी आहे.
  • पात्र अर्जदारांना आर्थिक मदत आणि कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो.
Bandhkam Kamgar Yojana

कामगारांसाठी महत्त्वाचे फायदे

  • आर्थिक सहाय्य
  • शैक्षणिक मदत
  • वैद्यकीय सुविधा
  • विमा संरक्षण

हे वाचा: बांधकाम कामगार योजना फायदे

अर्ज मंजूर झाला की नाही हे कसे तपासावे?

  • सर्वप्रथम गुगल वर बांधकाम कामगार योजना असे सर्च करावे.
  • त्यानंतर आपल्यासमोर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची mahabocw.in अधिकृत वेबसाईट दिसेल .
  • त्यानंतर तुमच्यासमोर अनेक पर्याय दिसतील यातील बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा .
  • या पर्यायावर क्लिक करा, त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर आणि तुमचा अर्धा सोबत दिलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.
  • त्यानंतर proceed to form या पर्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या (Bandhkam Kamgar Yojana) अर्जाची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल.
  • यामध्ये तुमचा अर्ज Accept झाला आहे की Pending आहे असे दिसेल.
  • अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार योजनेच्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकाल .

कामगारांसाठी सूचना

  • तुमच्या अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासा.
  • सर्व कागदपत्रे योग्यरीत्या भरण्याची खात्री करा.
  • कोणतीही अडचण आल्यास mahabocw.in वरील संपर्क साधा किंवा मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क करा.Bandhkam Kamgar Yojana

Leave a comment