बांधकाम कामगार योजना फायदे : bandhkam kamgar yojana fayde
बांधकाम कामगार योजना फायदे : bandhkam kamgar yojana fayde
Table of Contents
Toggleमहाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार कार्यरत आहेत हे जे बांधकाम कामगार आहे ते आपल्या जीवाची पर्वा न करता निरंतर कार्य करत असतात या बांधकाम कामगारांना खूप कमी पगार असतो त्या पगारांमध्ये या कामगारांना आपल्या कुटुंबाचा रोजचा दैनंदिन खर्च भागवणे कठीण असते. त्यामुळे ते आपल्या मुलांना एका चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्यासाठी असमर्थ असतात.
तसेच कार्य करत असताना त्यांना विविध अपघाताला सामोरे जावे लागते हॉस्पिटलचा खर्च औषध गोळ्या उपचारासाठी त्यांना खूप साऱ्या समस्येचा सामना करावा लागतो. तसेच अपघातात एखाद्या बांधकाम कामगाराचा मृत्यू देखील होतो जर घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला स्वतःचे जीवन जगण्यासाठी खूप साऱ्या समस्येचा सामना करावा लागतो. याचा सर्व विचार करून महाराष्ट्र सरकारने एक मे 2011 रोजी त्रिपक्षीय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना करण्यात आली.
या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांच्या कुटुंबांना विविध योजनेचा लाभ दिला जातो जेणेकरून बांधकाम कामगारांचे जीवनमान सुधारेल आणि त्यांचा विकास होण्यास मदत होईल.
योजनेचे नाव | बांधकाम कामगार योजना फायदे : bandhkam kamgar yojana fayde |
विभाग | बांधकाम कामगार विभाग |
उद्देश | बांधकाम कामगारांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रातील बांधकाम कामगार. |
लाभ | विविध प्रकारचा लाभ दिला जातो |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन /ऑफलाइन |
बांधकाम कामगार आरोग्य विमा
- बांधकाम कामगाराचा अपघात झाल्यास त्यांना अपघात विमा संरक्षण दिले जाते.
- कामगार जर आजारी पडल्यास त्यांना हॉस्पिटल विमा संरक्षण दिले जाते.
- पत्नी गरोदर असल्यास तिला मातृत्व लाभ दिला जातो.
- कामगार सेवा निवृत्ती झाल्यावर त्यांना वृद्धत्वाचा लाभ दिला जातो.
- काम करताना कामगाराचा अपघात होऊन स्थायी किंवा अस्थायी अपंगतत्व असल्यास लाभ दिला जातो.
- काम करत असताना एखाद्या कामगाराचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याला मृत्यू लाभ देण्यात येतो.
बांधकाम कामगार कल्याणकारी लाभ
- कामगार त्याची पत्नी किंवा पाल्यांना शिक्षण सहाय्य मिळते.
- बांधकाम कामगारांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणाचा खर्च दिला जातो.
- बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी खर्च दिला जातो.
- निवृत्तीवेतन
- बांधकाम कामगारांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.
बांधकाम कामगार इतर सुविधा
- बांधकाम कामगारांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येतात.
- कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी निवासाची सुविधा उपलब्ध केली जाते.
- कामगारांसाठी मनोरंजन आणि क्रीडा सुविधा करून दिली जाते.
- कामगारांसाठी कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून दिली जाते.
बांधकाम कामगार योजना फायदे : bandhkam kamgar yojana fayde
- बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राज्यातील कामगारांची ऑनलाईन नोंदणी करून कामगारांची संख्या माहिती केली जाईल जेणेकरून त्यांना विविध योजनेची सुरुवात करण्यास मदत होईल आणि लाभाचे वितरण करण्यासाठी देखील सोपे जाईल.
- या योजनेअंतर्गत राज्यातील कामगारांचे तसेच त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
- कामगाराचा तसेच त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
- एकाच योजनेच्या माध्यमातून कामगारांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच आरोग्य विषयी लाभ दिला जाईल.
- नोंदीत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000/- रुपयाची आर्थिक सहाय्य दिले जाते.
- बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते.
- योजनेअंतर्गत कामगारांना दोन वेळा चे मोफत जेवण दिले जाते..
- बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ देण्यात येतो.
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ देण्यात येतो.
- अटल पेन्शन योजनेचा लाभ दिला जातो.
- कामगाराच्या लहान मुलांना कामाच्या ठिकाणी पाळणाघर सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
- बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो.
- नोंदीत बांधकाम कामगारांकरिता राहण्यासाठी ट्राझिट कॅम्प ची सुविधा दिली जाते .
- बांधकाम कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी Essentional Kit चे वाटप केले जाते.
- प्रधानमंत्री आवास ( ग्रामीण) योजनेचा लाभ दिला जातो.
- इयत्ता पहिली ते सातवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या मुलांना प्रति वर्ष 25 हजार रुपयांचे मानधन दिले जाते.
- इयत्ता आठवी ते दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या मुलांना प्रति वर्ष 50 हजार रुपयांचे मानधन दिले जाते.
- इयत्ता 10 व इयत्ता 12 मध्ये किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास कामगारांच्या मुलांना दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
- इयत्ता 11 वी व इयत्ता 12 विचार शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष दहा हजार रुपयाची आर्थिक सहाय्य दिले जाते.
- कामगारांच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष एक लाख रुपयांची आर्थिक सहाय्य दिले जाते.
- कामगारांच्या मुलांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षि 60,000/- कृपया आर्थिक सहाय्य दिले जाते.
- कामगारांच्या पाल्यांना शासनमान्य पदवी के साठी प्रती शैक्षणिक वर्ष 20 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
- शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 25 हजार रुपये आर्थिक मदत तिचा लाभ दिला जातो.
- MS- ClT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती नोंदीत बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यास केली जाते
- बांधकाम कामगाराच्या आय आय टी वा तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती चा लाभ दिला जातो .
- कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फी साठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते.
- बांधकाम कामगारांच्या पाल्यांस पीएच .डी. अभ्यासक्रमासाठी तसेच प्रदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती दिली जाते.
- बांधकाम कामगाराच्या मुलांना वर्गात 75 टक्के उपस्थिती असल्यास आर्थिक मदत दिली जाते.
- नैसर्गिक प्रस्तुतीसाठी 15000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते.
- शास्त्रक्रियेद्वारे प्रस्तुतीसाठी 20000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते.
- लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाखाची आर्थिक मदत दिली जाते.
- एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शास्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावाने अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत ठेव बंद केले जातात.
- अपघातात कामगाराला 75 टक्के अपंगतत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास दोन लाखाची आर्थिक मदत केली जाते.
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येतो.
- कामगाराला दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीसह दर दिवशी आर्थिक मदत केली जाते.
- कामगारांना विमा योजनेचा लाभ देण्यात येतो.
- नोंदीत बांधकाम कामगाराची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते.
- कामगारांना व्यसनमुक्ती करिता निधी देण्यात येतो
- कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 5 लाखांची आर्थिक मदत दिली जाते.
- कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशी वारसास 2 लाखाची आर्थिक मदत केली जाते
- अनुदित बांधकाम कामगारांना बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य चा दिला जातो.
- अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अंतर्गत दोन लाखाची आर्थिक मदत दिली जाते
- अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत दोन लाखाची आर्थिक मदत दिली जाते
- 50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करिता दहा हजाराचे सहाय्य दिले जाते.
- घर बांधण्यासाठी घेतलेल्या सहा लाखाच्या कर्जाच्या व्याजाची रक्कम किंवा दोन लाखांचे आर्थिक मदत दिली जाते.
- बांधकाम कामगारांना बोनस दिला जातो.
- नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी मदत केली जाते.
- घरातून कामावर व कामावरून घरी जाण्यासाठी बांधकाम कामगारांना सायकल वाटप करण्यात येते .
- साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाते.
- बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (सेफ्टी किट) चला दिला जातो.
वरील दिलेले सर्व बांधकाम कामगार योजनेचे फायदे.(बांधकाम कामगार योजना फायदे : bandhkam kamgar yojana fayde)
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
1 thought on “बांधकाम कामगार योजना फायदे : bandhkam kamgar yojana fayde”