yojana doot bharti official website: असा करा अर्ज
yojana doot bharti official website: असा करा अर्ज महाराष्ट राज्य सरकार राज्यात राबवत असलेल्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहचव्यात व त्यांना योजनेचा लाभ घेता यावा या करीत राज्य सरकार कडून राज्यात 50000 योजनादूत नेमावण्यात येणार आहे.
Table of Contents
Toggleराज्यात नेमन्यात येणाऱ्या योजनादूत यांना प्रती महिना 10000 रुपये आर्थिक मानधन देण्यात येणार आहे. नेमणूक झालेल्या योजनादूत यांना जास्तीत जास्त 6 महीने या पदावर काम करता येणार आहे. त्यानंतर कसल्याही परिस्थितीत या पदाचा कार्यकाळ वाढवला जाणार नाही.
राज्यातील पात्र तरुणांना या योजनेअंतर्गत नोकरी ची संधि सरकार कडून देण्यात येत आहे. राज्य सरकार राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ला एक व शहरी भागात 5000 लोकसंख्यामागे एक या प्रमाणात 500000 जागा भरणार आहेल. या मध्ये अर्ज कसा करावा याच्या पात्रता काय या बद्दलची सविस्तर माहीत या लेखात आपण पाहणार आहोत.
योजना दूत पात्रता
- अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे
- अर्जदाराचे शैक्षणिक पात्रता अर्जदाराने कोणत्याही शाखेत आपली पदवी पूर्ण केली असावी अर्थात अर्जदार पदवीधर असावा
- संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे जसे की एम एस सी आय टी ट्रिपल सी किंवा बेसिक कॉम्प्युटर कोर्स पूर्ण केलेला असावा
- उमेदवाराकडे मोबाईल (अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे) तसेच तो मोबाईल हाताळण्याचे त्याला ज्ञान असावे
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे
- उमेदवाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
- उमेदवाराच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे (जर आधार लिंक नसेल तर उमेदवार निवड झाल्यानंतर मिळणारे मानधन त्याला मिळणार नाही)
योजना दूत नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे
- योजना दूध पोर्टलवर ऑनलाईन केलेला अर्ज त्याची प्रत
- लेटेस्ट डाऊनलोड केलेले अर्जदाराचे आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र/ अधिवास दाखला/ डोमासाईल प्रमाणपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स
- उमेदवाराचा पासपोर्ट साईजचा फोटो
- हमीपत्र ऑनलाइन अर्ज सोबतच्या नमुन्यामध्ये (पोर्टलवरून डाऊनलोड करता येते)
- मोबाइल क्रमांक
- ईमेल आयडी
- कामाचा अनुभव असल्यास त्याचा पुरावा
- संगणक ज्ञान प्राप्त असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- दुसऱ्या कोणत्याही पदावर कार्यरत नसले बाबतचे स्वयंघोषणापत्र
योजना दूत नोंदणी साठी अर्ज कोठे व कसा करावा. yojana doot bharti official website
yojana doot bharti official website: असा करा अर्ज
योजना दूत हे पद राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या उपक्रमअंतर्गत राबवण्यात येत आहे. या मध्ये अर्ज करण्यासाठी आपणास. https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल. या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपणास आपले नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
आपली नाव नोंदणी केल्या नंतर आपले संपूर्ण माहिती भरून घ्यावी लागेल. आपली माहिती भरल्यानंतर आपल्या समोर उपलब्ध असणाऱ्या रिक्त जागा दर्शवण्यात येईल.
आपण पात्र असलेल्या व आपल्या भागातील जागेसाठी आपन्न आपला अर्ज सादर करू शकता.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा या करीत खाली दिलेला व्हिडिओ पहा .
(yojana doot bharti official website: असा करा अर्ज )
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.