बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 bandhkam kamgar bonus 2024
बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 bandhkam kamgar bonus 2024
आज आपण या योजनेमध्ये बांधकाम कामगार दिवाळी बोनस किती बांधकाम कामगारांना किती दिले जाणार आहे याची माहिती घेणार आहोत. बांधकाम क्षेत्रात तसेच तर क्षेत्रात कमी पगारावर काम करणारे लोक राहत असतात.
कमी पगार असल्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पुरवणी शक्य नसते. मग सणासुदीच्या काळामध्ये म्हणजे दीपावलीच्या काळात आपल्या मुलांना नवीन कपडे, फटाके, घरामध्ये फराळीच्या वस्तू किराणा हे सर्व खरेदी करण्यासाठी पगार कमी असल्यामुळे त्यांची परिस्थिती नसते मंग त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे समस्त कामगार वर्गाला दिवाळी बोनस मिळवा यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे वेगवेगळी मागणी केली जाते. तसेच काही वेळा तर आंदोलन देखील केले गेले आहेत.
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कामगाराच्या भविष्यासाठी विविध योजना राबविते तसेच मंडळाकडे हजारो कोटीचा निधी उपलब्ध आहे. त्यामुळे मंडळाने कामगारांना कमीत कमी दहा हजार रुपये बोनस द्यावा. अशी मागणी कामगारा मार्फत केली जाते.
बांधकाम कामगारांनी यावर्षी म्हणजे 2024 मधील दिवाळीसाठी 10 हजार रुपये बोनसची मागणी करण्यात आलेली आहे.
बांधकाम कामगार अनुदान
इमारत बांधकाम कामगार संघटनेकडून बोनस ची मागणी केल्या नंतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 5000 रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा सरकार कडून करण्यात आली आहे. राज्यातील 10 लाख नोंदणी कृत बांधकाम कामगारांना दिवाळी साठी 5000 बोनस त्यांचा बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
कामगार योजना ५०००
बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस 5000 रुपये वितरित करण्यात येणार आहे. हे बोनस फक्त अर्ज नूतनीकरण केलेल्या लाभार्थी यांनाच वितरित करण्यात येणार आहे. ज्या कामगारानी आपली नोंदणी नूतनीकरण केली नाही अश्या कामगारांना या दिवाळी बोनस चा लाभ दिला जाणार नाही.
बांधकाम कामगार दिवाळी बोनस उद्दिष्टे
- बांधकाम कामगार तसेच त्यांच्या कुटुंबाचा दिवाळी सण आनंदाने व्हावा.
- बांधकाम कामगारांना बोनस स्वरूपात आर्थिक मदत देणे.
- कामगारांना सतत काम मिळत नाही म्हणून त्यांची आर्थिक स्थिति ढासळू नये.
- कामगारांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात आणि त्यांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये.
बांधकाम कामगार दिवाळी बोनस योजनेचे लाभार्थी
- या योजनेचे लाभार्थी बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत नोंदणीकृत कामगार
- योजनेअंतर्गत कामगारांना दिले जाणारे आर्थिक मदत
- योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दिपावली बोनस स्वरूपात 5 हजार ते 10 हजार रुपये दिले जातात.
बांधकाम कामगार बोनस पात्रता व अटी
- याचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीची बाई 18 ते 60 दरम्यान असावे.
- या योजनेत पात्रता असण्यासाठी बांधकाम कामगाराचे महाराष्ट्रातील वास्तव्य पंधरा वर्षे असावे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती हा मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य बाहेरी बांधकाम क्षेत्रातील कामगारास लाभ देण्यात येणार नाही.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तो नोंदणी कामगार असावा व नोंदणी चालू असावी.
- बांधकाम कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेत पात्र असण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी जीवित असलेला कामगार पात्र असेल.
- राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू एखाद्या इतर बोनस सुविधेचा लाभ घेत असल्यास त्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ देता येणार नाही.
बांधकाम कामगार बोनस अर्ज सोबत आवश्यक लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- 90 दिवस काम केलेल प्रमाणपत्र
- ई -मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेला बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे फोटो 3
- जन्माचे प्रमाणपत्र
- महानगर पालिकडून बांधकाम कामगार असलेले प्रमाणपत्र
- ग्रामपंचायत कडून ग्रामसेवकांकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र.
- घोषणापत्र
बांधकाम कामगार दिवाळी बोनस अर्ज करण्याची पद्धत
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना खालील दिलेल्या लिंक वर योजनेचा अर्ज डाऊनलोड करावा लागेल..
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित करून अर्ज सोबत लागणारी आवश्यक ती कागदपत्रे जोडून तो अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा पद्धतीने या योजनेचे अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
बांधकाम कामगारांना योजनेचा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न.
- अर्ज नूतनीकरण कसा करावा?
- अर्ज नूतनीकरण करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती भरून आपला अर्ज नूतनीकरण करू शकता.
2. बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कसे काढावे.
- बांधकाम कामगार नोंदणी पूर्ण झाल्यावर आपल्या जवळील बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन आपले स्मार्ट कार्ड मिळवू शकता.
3. बांधकाम कामगार योजना कोणासाठी आहे ?
- राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी ही योजना राबवण्यात येते.
4. बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024 किती मिळणार आहे?
- नोंदणी कृत बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस 2024 साठी प्रती लाभार्थी 5000 एवढे बोनस वाटप केले जाणार आहे.
Happy
Fakira Vikram Jadhav