पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती: post matric scholarship maharashtra

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती: post matric scholarship maharashtra

   पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती: post matric scholarship maharashtra पोस्ट मॅट्रिक शिष्यवृती या राज्यातील अनुसूचित जाती जमाती मधील विद्यार्थी यांना शिक्षणासाठी सरकार कडून आर्थिक मदत केली जाते. या मध्ये लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा व याच्या पात्रता काय आहेत या बद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

  पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती: post matric scholarship maharashtra या  योजनेच्या माध्यमातून किती शिष्यवृती रक्कम विद्यार्थी यांना वितरित केली जाते. रक्कम कशी वितरित केली जाते. या योजनेचा उद्देश व वैशिष्ट सर्व घटक कव्हर करणाच्या प्रयत्न केला आहे. 

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती: post matric scholarship maharashtra

योजनेचे नाव

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती: post matric scholarship maharashtra

लाभ

 विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क, उपलब्ध करून देणे.

लाभार्थी

अनुसूचित जाती-जमाती आणि नवबौद्ध विद्यार्थी

उद्देश

विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करणे.

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती: post matric scholarship maharashtra उद्देश

  •  विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे.
  •  विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी  मदत करून देणे.
  •  शिक्षण व्यवस्था मध्ये विद्यार्थ्याचे  गैरहजर चे प्रमाण कमी करणे
  •  उच्च शिक्षणाद्वारे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे.
  •  कुटुंबाची परिस्थिती गरीब असल्यामुळे शिक्षण सोडण्याची आवश्यकता भासू नये .

पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी आणि परीक्षा फी (फ्रिशिप) योजनेची वैशिष्ट्ये

  •  या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी व्यक्तीच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा करण्यात येते.

पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी आणि परीक्षा फी (फ्रिशिप) योजनेचे लाभार्थी

  •  या योजनेसाठी लाभार्थी अनुसूचित जाती- जमाती तसेच नवबौद्ध विद्यार्थी आहेत.

पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी आणि परीक्षा फी (फ्रिशिप) योजनेचे फायदे

  •  अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शिक्षण शुल्क , परीक्षा शुल्क आणि इतर अनुज्ञये शुल्क याची शासनाकडून परतफेड  प्रदान करण्यात येईल.
  •  या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत उपलब्ध करून दिली जाते
  •  शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थी गळती प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
  •  या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आवड निर्माण होईल व पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित होतील.
  • राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
  •  या योजनेअंतर्गत विद्यार्थी  शिक्षण पूर्ण करून एक चांगली  नोकरी किंवा व्यवसाय सुरु करू शकतील.

पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी आणि परीक्षा फी (फ्रिशिप) योजनेचे पात्रता

  •  या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याचा रहिवासीस पात्रता असेल.
  •  लाभार्थी अनुसूचित जाती जमाती मध्ये मोडत असावा. 
  • शासनाच्या धोरणात्मक अभ्यासक्रम अंतर्गत शिक्षण घेत असावा. 
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाख रुपये च्या आत असावे. 
  • विद्यार्थी याची 75 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. 
  • लाभार्थी याच्या कुटुंबातील या आधी जर दोन भावंडानी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 

पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी आणि परीक्षा फी (फ्रिशिप) योजनेच्या अटी व नियम

  •  महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल
  •  या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य बाहेरील विद्यार्थ्यांना घेता येणार नाही.
  •  लाभार्थी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपये पेक्षा कमी असावे. जास्त असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  •  विद्यार्थी अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध असाव.
  •  लाभार्थी विद्यार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती या अर्जात गृहीत धरले जाणार नाही आणि लाभ लाभाची राशी दिली जाणार नाही.
  •  या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी या अगोदर राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.
  •  विद्यार्थिनी व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी केवळ CAp माध्यमातून प्रवेश घेतलेला असा.
  •  केवळ एकदा संपूर्ण अभ्यासक्रम कालावधी अनुत्तीर्ण ग्राह्य धरले जाईल.
  •   महाराष्ट्र राज्याचा आदिवासी विद्यार्थी असावा.

पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी आणि परीक्षा फी (फ्रिशप) आवश्यक कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  •  रहिवासी दाखला
  •  लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र
  •  जात  पडताळणी प्रमाणपत्र
  •  गत वर्षाच्या परीक्षेची गुणपत्रिका
  •  अर्जदाराचे जात प्रमाणपत्र .
  •  इयत्ता दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका
  •  वस्तीगृह प्रमाण (आवश्यक असल्यास)
  •  वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  •  डोमेसाइल प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  •  CAP फेरी वाट पञ
  •  मोबाईल नंबर
  •  ई – मेल आयडी

अर्ज रद्द होण्याची कारणे

  •  अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्य बाहेरील असल्यास
  •  अर्जदार विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध जातीचा नसल्यास.
  •  या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी या अगोदर राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.
  •  विद्यार्थी शिक्षण घेत नसल्यास
  •  विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास.
  •  CAP माध्यमातून विद्यार्थ्यांने व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसल्यास.

अर्ज करण्याची पद्धत

  •  सर्वप्रथम लाभार्थी विद्यार्थ्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  •  होम पेजवर गेल्यावर नवीन अर्ज नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
  •  आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागेल.
  •  सर्व माहिती भरल्यानंतर रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा
  •  अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकाल.

निष्कर्ष

      आम्ही तुम्हाला या योजनेमध्ये पोस्ट मॅट्रिक ट्युशन्स फी आणि परीक्षा फी (फ्रिशिप) योजनेची सविस्तर माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे. तुमच्या परिसरामध्ये जे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना या शिष्यवृत्तीची माहिती द्या जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या ईमेल आयडीवर आमच्याशी संपर्क करा आमच्याकडून आपल्याला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल

Leave a comment