rabbi pik spardha 2024 रब्बी हंगाम पीक स्पर्धा योजना:पिकांची गुणवत्ता वाढवा आणि जिंका 50 हजारांचे बक्षीस पहा सविस्तर .

rabbi pik spardha 2024 रब्बी हंगाम पीक स्पर्धा योजना : शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यानी प्रयत्न करावेत, यासाठी कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामातील पिकांसाठी विकास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत, राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्या मुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धा या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे तसेच शेतकऱ्यांना प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक आल्यास बक्षीस पण देण्यात येणार आहे. तर या कार्यक्रमांतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे, तसेच बक्षीस स्वरूपात किती रक्कम दिली जाणार आहे,पात्रता काय आहे, अटी व नियम, अर्ज कोठे करायचा. याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत

rabbi pik spardha 2024 रब्बी हंगाम पीक स्पर्धा योजना शेतीसाठी प्रोत्साहन

rabbi pik spardha 2024 गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसायाला आव्हाने निर्माण झाली आहेत. हवामानातील प्रतिकूल बदल आणि वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, शेतीतील उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे स्पर्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
या स्पर्धात तालुका, जिल्हा किंवा राज्य पातळीवर प्रथम तसेच द्वितीय आणि तृतीय क्रमांक घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येणार आहे . ही स्पर्धा शेतकऱ्यांनी लागवडीचा खर्च कमी करून शेती उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच प्रत्यक्ष शेतकरी प्रगतशील व्हावा यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावी. विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय संपर्क साधावा कृषी विभागाकडून योजनेबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

रब्बी हंगाम पीक पेरणीची स्थिती

rabbi pik spardha 2024 जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २९ हजार ९०४ हेक्टरवर पेरणी झाली असून, हे प्रमाण ११७.६४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यामध्ये हरभऱ्याच्या पेरणीला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात आले आहे.

हे पण वाचा:
ladaki bahin yojana ladaki bahin yojana : या महिलांना मिळणर 4500 रुपये; पहा कोणत्या महिला आहेत पात्र.

रब्बी हंगाम पीक स्पर्धा योजना स्पर्धेचे स्वरूप व लाभ

  1. rabbi pik spardha 2024 बक्षीस रक्कम:
    • तालुका स्तरावर:
      • प्रथम क्रमांक: ५,००० रुपये
      • द्वितीय क्रमांक: ३,००० रुपये
      • तृतीय क्रमांक: २,००० रुपये
    • जिल्हा स्तरावर:
      • प्रथम क्रमांक: १०,००० रुपये
      • द्वितीय क्रमांक: ७,००० रुपये
      • तृतीय क्रमांक: ५,००० रुपये
    • राज्य स्तरावर:
      • प्रथम क्रमांक: ५०,००० रुपये
  2. rabbi pik spardha 2024 गट:
    • सर्वसाधारण गट
    • आदिवासी गट
  3. पिकांची निवड:
    • हरभरा, गहू, करडी आणि जवस यांसारख्या रब्बी हंगामातील पिकांसाठी स्पर्धा आयोजित केली जाईल.
  4. अर्ज प्रक्रियेचा कालावधी:
    • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: ३१ डिसेंबर
  5. स्पर्धा प्रवेश शुल्क:
    • सर्वसाधारण गट: ३०० रुपये
    • आदिवासी गट: १५० रुपये

रब्बी हंगाम पीक स्पर्धा योजना पात्रता व अटी

  1. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
  2. सर्वसाधारण आणि आदिवासी गट अशा दोन गटात स्पर्धे होणार असून . स्पर्धेत तालुका पातळी पासून सुरुवात होईल.
  3. शेतकऱ्यांना एका पेक्षा जास्त पिकांसाठी अर्ज करण्याची परवानगी आहे.
  4. तालुका पातळीवरील निवडीत यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांचा जिल्हास्तरावर आणि जिल्हा स्तरावरील शेतकऱ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होईल.

रब्बी हंगाम पीक स्पर्धा योजना अर्ज प्रक्रिया

  1. rabbi pik spardha 2024 अर्ज कुठे कराल?
    • स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा.
  2. महत्त्वाचे कागदपत्रे:
    • जमीन मालकीचा पुरावा
    • पीक नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
  3. rabbi pik spardha 2024 अधिक माहिती:
    • कृषी विभागाच्या संकेतस्थळावर योजनेसंबंधी सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर

या स्पर्धेचा उद्देश शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीत प्रगती साधण्यास प्रोत्साहित करणे आहे. हरित क्रांतीतील योगदान वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय शेती, ठिबक सिंचन, आणि हवामान आधारित पद्धतींचा अवलंब करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

कृषी विभागाची जनजागृती

कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना या योजनेविषयी माहिती देण्यासाठी मोहिमा राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून योजनेसाठी अर्ज करावा आणि आपल्या उत्पादन क्षमता सिद्ध करावी.

रब्बी हंगाम पीक स्पर्धा योजना शेवटची सूचना

शेतकऱ्यांनी शेती उत्पादन वाढवण्यासाठी स्पर्धेत सहभागी होऊन शासनाच्या प्रोत्साहनपर योजनांचा लाभ घ्यावा. जिल्हा आणि राज्य पातळीवर होणाऱ्या या स्पर्धेमुळे शेती व्यवसायात नावीन्यपूर्ण दृष्टिकोन तयार होण्यास मदत होईल. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.रब्बी हंगाम पीक स्पर्धा योजना

हे पण वाचा:
Farmer Subsidy Farmer Subsidy: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारी अनुदान या तारखेपर्यंत…खात्यावर होणार जमा..!

2 thoughts on “Farmer ID: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आता घरबसल्या मिळवा फार्मर आयडी…. फक्त 30 मिनिटात”

Leave a comment

Close VISIT MN CORNERS