Ladaki Bahin Yojana December : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. या योजनेमुळे एकूण 2 कोटी 23 लाख लाभार्थींना मदतीचा हात मिळाला असून त्यापैकी 67 लाख लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचे हप्ता वाटप करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्येच वाटण्यात आले होते.
Ladaki Bahin Yojana डिसेंबरच्या हप्त्यांचे वितरण
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यास सुरूवात झाली असून पहिल्या दिवशी 2 कोटी 34 लाख लाभार्थींपैकी 67 लाख लाभार्थीं महिलाच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत उर्वरित लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहिती नुसार राज्यातील लाडकी बहिणं योजना मध्ये पात्र असणाऱ्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता 24 डिसेंबर 2024 पासून वितरित करण्यास सुरवात झाली आहे. पात्र असणाऱ्या सर्व महिलांना 31 डिसेंबर पर्यन्त टप्प्या टप्प्याने निधी जमा केला जाईल असे देखील सांगितले आहे. त्या मुळे राज्यातील महिलांना डिसेंबर महिन्याचा लाभ जमा होण्यास सुरू झाले आहे, येत्या 5 दिवसात सर्व महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल. अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.
Ladaki Bahin Yojanaअर्जदारांची संख्या आणि पात्रता
जुलै महिन्यात सुरू झालेल्या या योजनेसाठी एकूण 2 कोटी 63 लाख अर्ज आले होते. त्यापैकी 2 कोटी 47 लाख अर्ज पात्र ठरले आहेत. परंतु, 12 लाख 87 हजार लाभार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडले नसल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळू शकला नाही. ऑक्टोबर महिन्यात 2 कोटी 34 लाख लाभार्थींच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये मासिक रक्कम जमा करण्यात आली होती, जी सुमारे साडेसात हजार रुपये होते.
Ladaki Bahin Yojanaडिसेंबरसाठी तरतूद आणि कामाची गती
डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे वाटप करण्यासाठी सरकारने 1400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महिला विकास विभागाचे खाते राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे कायम राहिल्याने, त्यांनी शनिवारी खातेवाटप झाल्यानंतर लगेचच डिसेंबर महिन्याचा लाभ वितरण प्रक्रियेला गती दिली आहे.
Ladaki Bahin Yojana नवे लाभार्थी आणि सहा महिन्यांचे अनुदान
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या 12 लाख 87 हजार लाभार्थ्यांना सहा महिन्यांचे एकत्रित नऊ हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला. राज्यातील लाभार्थी महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करून महायुतीला घवघवीत यश मिळवून दिले आहे.
निष्कर्ष
लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक मदतीचा मोठा आधार ठरत आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले असून, त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला आहे. भविष्यात योजनेच्या विस्तारासाठी सरकारकडून अधिक योजना आखल्या जातील, अशी अपेक्षा आहे.
1 thought on “Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, 67 लाख महिलांच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा.”