drone didi yojana : महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकारची ड्रोन दीदी योजना.

drone didi yojana ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारची नमो ड्रोन दीदी योजना

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

drone didi yojana महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे. विशेषतः महिला शेतकऱ्यांना या योजनेद्वारे मोठा आधार मिळत आहे. ड्रोन दीदी योजनेमद्धे फक्त बचत गटात समाविष्ट असणाऱ्या महिलांच अर्ज करू शकतात आणि त्यांनाच हा लाभ दिला जातो.

drone didi yojana

ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रशिक्षण


या योजनेंतर्गत महिलांना ड्रोन ऑपरेशनपासून ते डेटा विश्लेषणापर्यंतचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणामध्ये महिलांना पिकांवर कीटकनाशके फवारणे, बियाणे पेरणी, तसेच खतांचा योग्य वापर कसा करावा, याबाबत शिकवले जाते. महिलांना त्यांच्या पिकांचे संरक्षण कसे करायचे याचे तांत्रिक ज्ञानही दिले जाते. ड्रोन चलवण्या पासून ते ड्रोन ची थोड्या प्रमाणात बिगाड दुरुस्त करण्यासाठी देखील प्रशिक्षण दिले जाते.

बचत गटातील महिलांसाठी ड्रोन दिदी योजना

महिला बचत गटांचा सहभाग
महिला बचत गटांच्या (SGH) सदस्य महिलांसाठी ही योजना विशेषतः उपयुक्त ठरली आहे. जर तुम्ही 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आणि बचत गटाशी संबंधित असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज करणाऱ्या महिलांनी कृषी कार्यात सक्रिय असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण आणि पगार


नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत निवड झालेल्या महिलांना 15 दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना “ड्रोन दीदी” म्हणून काम करण्याची संधी मिळते. यामध्ये महिलांना दरमहा 15,000 रुपयांपर्यंतचा पगार मिळतो, ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतात.

drone didi yojana अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे


या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • आधार कार्ड
  • स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड
  • ईमेल आयडी आणि फोन नंबर
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • स्वयं-सहायता गटाचे ओळखपत्र

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा प्रयत्न


ही योजना महिलांना केवळ रोजगारच नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडत आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारचे हे मोठे पाऊल ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी निश्चितच प्रभावी ठरणार आहे.

2 thoughts on “drone didi yojana : महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकारची ड्रोन दीदी योजना.”

Leave a comment

Close Visit Batmya360