ONION RATE DOWN : कांद्याचा दरात मोठी घसरण कांद्याचे दर 50 टक्के घसरले.

ONION RATE DOWN : मागील बऱ्याच दिवसापासून कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात थोडे प्रमाणात का होईना वाढ झालेली पाहायला मिळत होती. परंतु शेतकऱ्यावरील संकट कधी संपत नसते याप्रमाणे शेतकऱ्यांचे मालाला मिळत असलेला चांगला भाव देखील टिकून राहिला नाही. यातच कांद्याचे भाव खूप मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे कांड उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

मागील पंधरा दिवसाचा विचार केला तर कांद्याच्या दरामध्ये 50% ची घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पडत्या दरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च निघणे सुद्धा कठीण झालेले दिसून येत आहे.

ONION RATE DOWN

हे वाचा: कांदा चाळ अनुदान योजना

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
KRUSHI SAMRUDH YOJANA शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी ‘कृषी समृद्धी’ योजना: हवामान बदलाच्या संकटातून बाहेर पडून आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग: KRUSHI SAMRUDH YOJANA

ONION RATE DOWN शासनाचे धोरण ठरते शेतकऱ्यांना तोट्याचे

प्रत्येक वेळी शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव मिळत असताना शासन आपल्या धोरण बदलते आणि या धोरणामुळेच शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर संकटाचा सामना करावा लागतो ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा उत्पादन खर्च तर दिवसेंदिवस वाढतच आहे परंतु पिकाला मिळणारा भाव हा स्थिर नसल्यामुळे शेतकऱ्यांना नेहमीच त्यांनी घेतलेल्या पिकामध्ये तोटा सहन करण्याची वेळ उद्भवते यावर शासनाने आपल्या धोरणावर नियंत्रण ठेवल्यास शेतकऱ्यांच्या मालाला देखील चांगला भाव मिळू शकतो यातच आता कांद्याचे भावाबद्दल खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.

ONION RATE DOWN कांदा दरात 50 टक्के पेक्षा जास्त घसरण

ONION RATE DOWN पावसाळ्यात लागवड करण्यात आलेला लाल कांदा काढणी करण्यास सुरवात करण्यात आली. सुरवातीला कांद्याला चांगला भाव मिळत होता. मात्र काही दिवसांपासून भाव खाली येऊ लागले. अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटामुळे कांद्याचे उत्पादन आधीच घटले आहे. त्यात कांद्याला मिळणारा भाव देखील पडल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या बाजारात येणाऱ्या लाल कांद्याची टिकवण क्षमता अवघ्या काही दिवसांचीच असल्याने बाजारात कवडीमोल भावात कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव सध्या निम्म्यापेक्षा अधिक घसरले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी म्हणजे ९ डिसेंबरला बाजारात असणारा कांद्याचा ३ हजार ४०० रुपये प्रति किटल सरासरी भाव मिळत होता. आज २४ डिसेंबरला हे दर १ हजार ६०० ते १ हजार ७०० रुपयांपर्यंत घसरला आहे. कांद्याचे भाव पडल्याने दररोज कोट्यावधीचे नुकसान सहन करण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे.

हे पण वाचा:
onlion policy committee कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचं नवं धोरण कधी येणार? onlion policy committee

कांद्याचे भाव घसरत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अर्थात मिळेल त्या दरात कांदा विक्री करावा लागत आहे. यामुळे सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क तातडीने हटवा आणि कांद्याला कायमस्वरूपी चांगला भाव मिळेल, यासाठी उपाय योजना कराव्यात, अशी मागणी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave a comment