कांदाचाळ अनुदान योजना kanda chal yojana
कांदाचाळ अनुदान योजना kanda chal yojana
आज आपण कांदा अनुदान योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. कांद्याचे पीक शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये घेता येते. आणि थोड्या क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न परंतु या पिकाला योग्य वेळी योग्य तो भाव नसतो. त्यामुळे शेतकरी हे नाराज होतात. आणि कांदा पिकाचे उत्पन्न घेण्यास टाळतात. अशा परिस्थितीत राज्य सरकारने कांदा चाळ अनुदान योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे.
राज्य सरकार शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कांदा चाळ उभारण्यासाठी 1 लाख 60 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर मराठी तंत्रज्ञान माहिती या वेबसाईटवर कांदा चाळ अनुदान योजनेची माहिती पाहणार आहोत. या योजनेचे उद्देश काय आहे. यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत.
कांदाचाळ अनुदान योजना किती अनुदान मिळते
kanda chal yojana
5,10,15,20 व 25 मॅट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के व कमाल रुपये 3,500/-प्रती मॅट्रिक टन या क्षमतेनुसार अर्थसहाय्य म्हणजेच अनुदान राहते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कांदा चाळ उभारणी प्रकल्पासाठी मंजुरी 96 हजार 220 रुपये आणि साहित्यासाठी 64 हजार 147 असे एकूण 1 लाख 60 हजार 367 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा शेतकरी वैयक्तिक आणि सामुदायिरित्या लाभ घेऊ शकतात. सामुदायिक गटामध्ये बचत गट ,शेतकरी गट, शेतकरी कंपनी यांचा समावेश होतो.
25 टन कांदा उत्पादन हे साधारणतः एक हेक्टर क्षेत्रामध्ये होते तर या कांदा साठवण गोदामासाठी 3.90 मी रुंद,12 मीटर लांबी आणि 2.95 उंची आकारमाना असावी. यासाठी शासनाकडून 1लाख 60 हजार 369 रुपये अनुदान देण्यात येईल. पण यापेक्षा जास्त जर खर्च झाला तर लाभार्थी व्यक्तीला भरावा लागेल
कांदाचाळ अनुदान योजना पात्रता
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीला स्वतःची शेती आवश्यक आहे
- लाभार्थी व्यक्तीला सातबारा आणि कांदा पिकाची नोंदणी असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी व्यक्तीकडे कांदा पीक असणे बंधनकारक आहे.
कांदाचाळ अनुदान योजना उद्दिष्टे
- या योजनेअंतर्गत कांदा चाळ उभारल्याने शेतकऱ्याला कांदा पिकाच्या साठवणुकीत नुकसान कमी होते.
- बदलत्या वातावरणामुळे कांदा या पिकाचे भाव चढ उतार होतात अशा या समस्येवर अशांत नियंत्रण मिळवणे.असे या योजनेचे उद्देश आहे
कांदाचाळ अनुदान योजना लाभार्थी
- लाभार्थी व्यक्ती कांदा उत्पादन शेतकरी असला पाहिजे.
- या योजनेचा लाभ महिला गटातील शेतकऱ्यांना दिला जाईल.
- बचत गट, शेतकरी गट, शेतकरी कंपनी
- शेतकऱ्यांची उत्पादक संघ
- नोंदणीकृत शेती संबंधित संस्था
- शेतकऱ्यांची सरकारी संस्था
- सरकारी पण संघ
कांदाचाळ अनुदान योजना आवश्यक लागणारे कागदपत्र
- सातबारा उतारा
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- बँक खाते क्रमांक
- विहित नमुन्यातील हमीपत्र
- अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र.
कांदा चाळ अनुदान योजना अर्ज करण्याची प्रक्रिया kanda chal yojana
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम लाभार्थी व्यक्तीने महाडीबीटीच्या पोर्टल वर जावे लागेल.
- महाडीबीटी पोर्टल ओपन केल्यानंतर अर्ज करा हे ऑप्शन निवडून फलोत्पादनाच्या बाबी निवडा या ऑप्शन वर क्लिक करावे.
- त्यामध्ये कांदा चाळ ही बाब निवडावी.
- कांदा चाळ बाब निवडल्यानंतर विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यावी.
- आवश्यक लागणारी कागदपत्रे अपलोड करावी. आणि अर्ज सबमिट करावा.
अशाप्रकारे तुम्ही कांदा चाळ अनुदान योजनेची प्रोसेस पूर्ण करू शकतात.