ahilayadevi holkar ropwatika yojana पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना: शेतकऱ्यांसाठी संधी
देशातील शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना विविध घटकांचा लाभ मिळण्यासाठी. रोजगार निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार विविध योजनांचा अवलंब करते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना व्यवसाय वाढीसाठी व उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन दिले जाते. यातच शेतकऱ्यांसाठी व कृषी पदवीधारक तरुणांसाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण योजना. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना (ahilayadevi holkar ropwatika yojana). याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात आपण पाहणार आहोत.
महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सुरू केली आहे. ही योजना शेतकऱ्यांना दैनंदिन वापरातील भाजीपाला पिकांच्या दर्जेदार आणि रोग मुक्त रोपांची निर्मिती करून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी व पूरक व्यवसायाची संधी मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
ahilayadevi holkar ropwatika yojana योजनेचे उद्देश
- दर्जेदार रोप निर्मिती:
भाजीपाला पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाने उत्तम व कीडरोगमुक्त रोपे तयार करणे. - उत्पन्नवाढ:
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आधुनिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने रोपवाटिका उभारणी करण्यास प्रोस्थ्यहण देणे. - पीक रचनेत बदल:
दैनंदिन वापरातील विविध प्रकारच्या भाजी पाल्याच्या लागवडी साठी जागतिक दर्जाचे आणि उत्पन्न वाढ देणारी भाजीपाला रोपे उपलब्ध करून देणे.
हे वाचा: महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना
अर्जासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची कमीत कमी एक एकर जमीन असावी.
- पाण्याची कायमस्वरूपी सोय असणे आवश्यक.
- महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
- महिला गट आणि शेतकरी गटाला द्वितीय प्राधान्य.
- यापूर्वी रोपवाटिका, शेडनेट हाऊस किंवा हरितगृहासाठी अनुदान घेतलेल्या व्यक्तींना या योजनेतून वगळले जाईल.
आवश्यक कागदपत्रे:
- सातबारा उतारा
- आठ-अ उतारा
- बँक खाते पासबुकची झेरॉक्स
- आधारकार्ड
- स्थळ दर्शक नकाशा
- कृषी पदवी प्रमाणपत्र
- शेतकरी उत्पादक गट असल्यास नोंदणी प्रमाणपत्र अवश्यक
योजनेची वैशिष्ट्ये
- भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाते.
- टोमॅटो, वांगी, मिरची, कांदा, कोबी यांसारख्या भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिका उभारणी.
- शेतकऱ्यांना शेटनेट, प्लास्टिक टनेल, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर, प्लास्टिक क्रेटसाठी अनुदान उपलब्ध.
मिळणारे अनुदान अर्थसाहाय्य
- रोपवाटिका निर्मिती एकूण खर्च: ₹5,55,000
- रोपवाटिका निर्मिती साठी शासनाचे मिळणारे अनुदान:** ₹2,77,500
- उर्वरित खर्च लाभार्थीला स्वतः करावा लागेल.
अर्ज प्रक्रिया
ahilayadevi holkar ropwatika yojana अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येतो. वरील सर्व कागदपत्रा सहित ऑनलाइन अर्ज सादर करता येतो. अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे
- सर्व प्रथम आपल्याला https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल
- संकेतस्थळावर गेल्यानंतर आपण या आधी mahadbt पोर्टल वर नोंदणी केली असेल तर आपणास लॉगिन पर्याय वापरावा लागेल.
- या आधी नोंदणी केलेली नसल्यास आपणास नवीन नोंदणी हा पर्याय निवडून आपली नोंदणी पूर्ण करावी लागेल.
- लॉगिन केल्या नंतर आपणास अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आपल्या समोर नवीन अर्ज करण्यासाठी टॅब ओपन होईल.
- फलोत्पादन या टॅब समोरील बाब निवडा या पर्यायवर क्लिक करा.
- घटक मध्ये इतर घटक निवड करा.,
- बाब मध्ये भाजीपाला रोपवाटिका हा घटक निवडा.
- नियम अटी मान्य करून अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा.
ahilayadevi holkar ropwatika yojana निवड प्रक्रिया बाबत सूचना
- स्थानिक तालुकास्तरीय कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधा.
- प्रकल्पासाठी पूर्वसंमती मिळविल्यानंतरच काम सुरू करा.
- अर्ज करताना सर्व कागदपत्रांची पूर्तता करा.
- अर्जाचे शुल्क भरले तरच आपला अर्ज लॉटरी साठी ग्राह्य धरण्यात येईल.
- लॉटरी मध्ये निवड झाल्यानंतर आपणास बाकीचे कागदपत्रे जमा करावी लागतील.
योजनेतील महत्वाचे मुद्दे
- महिला कृषी पदवीधारकांना सर्व प्रथम प्राधान्य.
- शेतकऱ्यांना भाजीपाल्याची दर्जेदार रोपे मिळाल्याने शेतीचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
- शेती उत्पन्न वाढ झाल्यामुळे शेतकरी स्वावलंबी होतील.
- कृषी क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनातून शाश्वत व्यवसायाच्या संधी निर्माण होणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी ही योजना पूरक व्यवसायाच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरणार आहे. राज्यातील कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी या योजनेचा अवलंब करावा. ahilayadevi holkar ropwatika yojana