Solar Pump Yojana :सोलर पंप बसवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्याची 4 लाख 15 हजाराची फसवणूक, पहा सविस्तर

Solar Pump Yojana : केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी सोलर पंप योजना राबवली जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना सोलर पंप अनुदानावर दिले जात आहेत. या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे, परंतु याच योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या काही एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात सोलर पंप लावून देण्याच्या नावाखाली फसवणुकीचा एक मोठा प्रकार समोर आला आहे

सरकार शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सोलार पंप योजना (Solar Pump Yojana) राबवली जात आहे. तर या योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात फसवणुकीची घटना घडलेली आहे. शेतकऱ्याला सोलर पंप (Solar Pump Yojana) बसवून देण्याच्या नावाखाली फसवणुकीची घटना घडली आहे.पांढरकवडा तालुक्यातील तेलंगटाकडी येथील शुभम भीमराव पाटील या शेतकऱ्याच्या बाबत ही घटना घडली आहे.

Solar Pump Yojana

Solar Pump Yojana शेतकऱ्यांची 4 लाख 15 हजार 101 रुपयाची फसवणूक

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात तेलंगटाकडी येथील शुभम भीमराव पाटील या शेतकऱ्याला तुझ्या शेतात सोलार पंप अपडेट करून त्यावर मेडा कंपनीकडून सोलार साठी सरकारी अनुदान देतो. आणि 5 ते 7.05 एच.पी. ची मोटार मिळवून देईल.असे म्हणून त्या व्यक्तीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्याची 4 लाख 15 हजार 101 रुपयाची फसवणूक केली. या प्रकरणी पवन प्रमोद गौरकार रा. स्वप्प्रीलनगर वडगाव यवतमाळ यांच्याविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात कलम 406 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
mahadbt new rule महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाखा पर्यंत अनुदान mahadbt new rule

हे वाचा : मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी 90 टक्के अनुदान! अर्ज करण्यास सुरुवात, ही आहे अंतिम तारीख….

Solar Pump Yojana येथे करा तक्रार

मागेल त्याला सोलर पंप योजनेत लाखो शेतकऱ्यांचा समावेश आहे.त्यामुळे या योजनेच्या नावाखाली एजंटचा सुळसुळाट सुरू आहे. अनेक शेतकरी अशा प्रकरणांमध्ये फसवू शकतात .त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहावे . शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी की कोणतेही एजंट किंवा मध्यस्थास माहिती देत असताना अत्यंत काळजी घ्यावी .किंवा तुम्हाला काही माहिती हवी असल्यास थेट मागेल त्याला सोलार पंप योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळेल . Solar Pump Yojana

हे पण वाचा:
ladki bahin yojana ekyc लाडकी बहीण लाभार्थींसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक, आधार क्रमांक कोणाचा टाकावा! ladki bahin yojana ekyc

Leave a comment