Ladki Bahin Yojana :सरकारने शब्द पाळला! लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात ; असं करा चेक

Ladki Bahin Yojana  : राज्यातील महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीला सुधारण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेला राज्यभरात महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अनेक महिलांनी या योजनेत सहभाग घेतला आहे आणि त्या महिलांना या (Ladki Bahin Yojana)  योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा हप्ते वितरित करण्यात आले असून आता लाभार्थी महिलांचे लक्ष जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे लागलेले आहे. ज्या महिला सातव्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत होत्या त्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की ,सरकारने आता जानेवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास आज पासून सुरुवात केलेली आहे.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana  सरकारने दिलेला शब्द पाळाला

Ladki Bahin Yojana  योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांनी देखील घेतलेला आहे असे, पडताळणी करताना उघड झालेले आहे.या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार? याबाबत वारंवार प्रश्न विचारण्यात येत होता. त्यावर बोलताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडमनी जानेवारी चा हप्ता हा 26 जानेवारी च्या अगोदर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी गवाही दिली होती.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : सोलर पंप बसवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्याची 4 लाख 15 हजाराची फसवणूक, पहा सविस्तर

पण प्रजासत्ताक दिन अर्थात 26 जानेवारी जवळ येत आला तरी पण जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होत नसल्याने नेमकं काय झाले? असा विचार करत लाडक्या बहिणींमध्ये अस्वस्थता होती. पण आता अखेर शुक्रवारी 24 जानेवारी पासून लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही, कसे कराल चेक?

लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत येणारा हप्ता थेट बँक हस्तांतरण पद्धतीने अर्थात डीबीटी द्वारे जमा होत आहे. त्यामुळे जर पैसे तुमच्या अकाउंट मध्ये जमा झाले असतील तर तुमच्या मोबाईल वर पैसे जमा झालेला मेसेज येईल. जर तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झालेला मेसेज आला नाही तर तुमच्या बँकेच्या ॲपमध्ये जाऊन तिथे डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का? ते तुम्हाला चेक करता येईल. तसेच तुम्ही बँकेत जाऊन पण देखील पैसे आले की नाही हे चेक करू शकतात.

Ladki Bahin Yojana  2100 रुपये कधी देणार

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दोन दिवसा अगोदर पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये करण्याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं होतं. आदिती तटकरे यांनी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्याची शिफारस केली जाईल, त्यानंतर याच वाढीव खर्चाची अधिवेशनातच तरतूद केली जाईल, असं त्यांनी म्हटले होतं. त्यामुळं आता लाडक्या बहिणींना अधिवेशनानंतर वाढीव हप्ता मिळणार आहे . Ladki Bahin Yojana .

Leave a comment