Drone Didi Yojana :राज्य सरकारने नमो ड्रोन दीदी योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय 23 जानेवारी रोजी घेतला आहे. या नमो ड्रोन दीदी योजनेतून महिला बचत गटांना 80 टक्के अनुदानावर ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने एप्रिल 2024 रोजी. राज्य सरकारला पत्र पाठवले होते. पण ते पत्र पाठवल्यानंतरही राज्य सरकारने कार्यवाही केलेली नव्हती.

सरकार आता समिती स्थापन करून राज्यात नमो ड्रोन दीदी योजना राबवण्याच्या दिशेने सरकारने पाऊल टाकले आहे. त्यामुळे आता बचत गटांना ड्रोन दिले जाणार आहे . या योजनेचा मुख्य उद्देश महिला बचत गटांना ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आहे. या योजनेतून महिलांना नवीन व्यवसाय करण्याची संधी मिळतील, आणि शेतकरी समुदायाला आवश्यक असलेल्या सेवांची पुरवठा करणारी एक नविन दिशा मिळेल.
Drone Didi Yojana उद्दिष्टे
केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना, तसेच राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मिशन अंतर्गत महिला बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या ड्रोन च्या मदतीने द्रव्य खत आणि कीडनाशकाच्या फवारणीसाठी फायदा होणार आहे तसेच हा ड्रोन महिला भाड्याने देखील चालू शकतात. त्यामुळे आर्थिक सक्षमीकरणाला गती देता येऊ शकते, अशा उद्देशाने केंद्र सरकारने नमो नमो दीदी योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
हे वाचा : सरकारने शब्द पाळला! लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात ; असं करा चेक
Drone Didi Yojana या योजनेचा लाभ
नमो ड्रोन दीदी योजनेतून 2024-25 ते 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये देशातील 14 हजार 500 निवडक महिला बचत गटांना ड्रोन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून 1 हजार 261 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे.याचा लाभ 14 हजार 500 महिला बचत गटांना होणार आहे
Drone Didi Yojana महिला बचत गटांना किती अनुदान देण्यात येणार
महिला बचत गटांना नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत ड्रोन खरेदीसाठी आणि इतर साहित्य खरेदीसाठी साठी 80 टक्के दराने जास्तीत जास्त 8 लाख रुपये पर्यंत आर्थिक सहाय्यक केंद्र सरकार करणार आहे. यासाठी केंद्र सरकारने 1 हजार 261 कोटी निधी उपलब्ध करून दिला असून आता या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यासाठी मान्यता दिली आहे.
निष्कर्ष
“नमो ड्रोन दीदी” योजना महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे. योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि समाजात आपला ठसा उमठवण्यासाठी नव्या मार्गांची ओळख होईल. ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे महिला शेतकरी समुदायासाठी महत्त्वाची सेवा पुरवू शकतात आणि आपले जीवनमान उंचावू शकतात. Drone Didi Yojana
1 thought on “Drone Didi Yojana :राज्यात नमो ड्रोन दीदी योजनेची लवकरच होणार अंमलबजावणी; महिला बचत गटांना 80 टक्के अनुदान.”