lic smart pension plan ; एकदाच करा गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन. LIC ची भन्नाट ऑफर.

lic smart pension plan भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी कडून ग्राहकांसाठी एक नवीन योजना आणण्यात आली आहे. या नवीन योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना फिक्स पेन्शन वितरित केली जाणार आहे. एलआयसी ने लॉन्च केलेल्या या नवीन पॉलिसी चे नाव स्मार्ट पेन्शन योजना (lic smart pension plan) असे ठेवण्यात आले आहे. या पॉलिसीच्या माध्यमातून वैयक्तिक तसेच संयुक्त पेन्शनधारक या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात. स्मार्ट पेन्शन प्लान ही पॉलिसी नेमकी आहे काय? याचा लाभ कसा दिला जातो याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखातून आपण पाहणार आहोत.

एलआयसी कडून नवीन पेन्शन योजना म्हणजेच स्मार्ट पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. ही पॉलिसी वित्तीय सेवा सचिव एम. नागराजू आणि एलआयसी कंपनीचे सीईओ सिद्धार्थ मोहंती ती यांच्यामार्फत सुरू करण्यात आली आहे. या पेन्शन योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना सिंगर किंवा जॉईन दोन्ही प्रमाणात पेन्शनचा लाभ व्यतिरित केला जातो.

lic smart pension plan

हे वाचा: पोस्ट ऑफिस ची खास बचत ठेव योजना

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अबब ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 26.34 लाख महिला अपात्र

lic smart pension plan काही ठराविक वैशिष्ट्ये

आर्थिक सुरक्षा : योजना तुम्हाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुरक्षा प्रदान करते.

एक वेळ प्रीमियम भरणा: एकदा तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली की तुम्हाला तुम्ही ठरवलेल्या प्रमाणानुसार पेन्शन मिळत राहील ज्यामध्ये मासिक त्रेमासिक सहामाही आणि वार्षिक अशा सर्व पर्यायानुसार तुम्ही लाभ घेऊ शकता.

एक रकमी लाभ घेण्याची सुविधा. या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही गरज भासल्यास काही प्रमाणात किंवा पूर्ण पैसे काढू शकता.

हे पण वाचा:
women new scheme महिलांना मिळणार 12 लाख रुपये कर्ज.. women new scheme

तात्काळ कर्ज सुविधा या पॉलिसीच्या माध्यमातून पॉलिसी सुरू केल्यापासून पुढील तीन महिन्यानंतर तुम्ही कोणत्याही क्षणी यावरती कर्ज घेऊ शकता.

स्मार्ट पेन्शन योजना माहिती

lic smart pension plan स्मार्ट पेन्शन योजना मध्ये तुम्हाला कमीत कमी एक लाख रुपये एवढी गुंतवणूक करावी लागते. जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेली नाही.

किमान पेन्शन रक्कम यामध्ये तुम्ही एक लाख रुपये गुंतवले असता तुम्हाला प्रति महिना 1000 रुपये या प्रमाणात पेन्शन वितरित केली जाते, त्यानुसारच जर तुम्ही त्रैमासिक लाभ घेत असाल तर तुम्हाला प्रति पेन्शन 3000 रुपये या प्रमाणात निधी दिला जातो. तसेच सहा माहीसाठी 6000 हजार रुपये व वार्षिक साठी 12,000 रुपये या प्रमाणात पेन्शन वितरित केली जाते.

हे पण वाचा:
LIC Jeevan Shiromani policy LIC ची खास योजना, फक्त 4 वर्षाच्या प्रीमियम मध्ये मिळवा 1 कोटी रुपये , काय आहे स्कीम? जाणून घ्या LIC Jeevan Shiromani policy

स्मार्ट पेन्शन योजनेमध्ये पॉलिसी धारकाला मासिक प्रेमासिक सहामाही आणि वार्षिक या आधारावर पेन्शन वितरित केली जाते. तुम्हाला हवा असणारा पर्याय निवडून तुम्ही पेन्शन मिळू शकतात. जर तुम्ही आधीच एलआयसी पॉलिसी धारक असाल तर तुम्हाला याचा अधिक लाभ मिळू शकतो. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वयाची अट 18 वर्षे ते 100 वर्ष या वयोगटातील कोणतीही व्यक्ती यामध्ये सहज गुंतवणूक करू शकते.

Leave a comment