PM Mudra Loan : अनेक लोकांना नोकरी करायला आवडत नाही .त्यांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय करण्याची इच्छा असते. परंतु पैशाच्या अडचणीमुळे इच्छा असताना पण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाही. जर तुम्ही पैशाच्या अडचणीमुळे इच्छा असताना पण व्यवसाय सुरू करू शकत नसता तर सरकारी स्कीम अंतर्गत कर्ज घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात. तर आजच्या या लेखात आपण पाहूया सरकारच्या कोणत्या योजनेअंतर्गत कमी व्याजदरावर लोन घेऊन व्यवसाय सुरू करू शकतात याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना
जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असाल आणि पैशाच्या अडचणीमुळे करू शकत नसाल तर तुम्हाला सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा लोन (PM Mudra Loan) योजनेअंतर्गत व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेऊ शकतात. तुम्ही या योजनेअंतर्गत लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय करू शकतात. या योजनेअंतर्गत कर्ज घेण्याची कारण म्हणजे, तुम्हाला कमी व्याजदरात सहज कर्ज मिळेल.
हे वाचा : मंत्रिमंडळ बैठकीतील 6 महत्त्वाचे निर्णय ;पहा सविस्तर
PM Mudra Loan योजनेचे उद्देश
प्रधानमंत्री मुद्रा लोन (PM Mudra Loan) योजना ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी 2015 मध्ये सुरू केलेली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. या योजनेअंतर्गत हे कर्ज केवळ बिगर कॉर्पोरेट आणि बिगर शेती व्यवसायांसाठी दिलं जातं .
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे व्याजदर काय?
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना (PM Mudra Loan) अंतर्गत कर्जाचे व्याजदर अत्यंत कमी आहे . हा व्याजदर 9 ते 12 टक्केच्या दरम्यान आहेत. याशिवायकर्जत अन्य कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारले जात नाही . या योजनेअंतर्गत कर्ज हे तीन प्रकारात दिले जाते.
PM Mudra Loan कर्जाचे प्रकार
हे कर्ज (PM Mudra Loan) तीन प्रकारांमध्ये दिले जाते ते तीन प्रकार म्हणजे,शिशु लोन,किशोर लोन आणि तरुण लोन याचा समावेश आहे .
- शिशु लोन : जर तुम्हाला शिशु लोन योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही 50,000 रूपयापर्यंत कर्ज घेऊ शकतात .
- किशोर लोन : तुम्ही किशोर श्रेणीमध्ये 5 लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकतात .
- तरुण लोन : तरुण श्रेणीमध्ये तुम्ही 20 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात .