डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंब योजना शेतकऱ्यांना कसा मिळतो लाभ.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंब योजना शेती व्यवसाय हा बेभरवशाचा व्यवसाय मानला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. यातीलच एक प्रमुख योजना म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. ही योजना राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. या योजमद्धे अर्ज करण्यासाठी कोण पात्र असणार कोणत्या घटकाला या योजनेतून अर्थ सहाय्य वितरित केले जाते. अर्ज कोठे करावा आणि कागदपत्रे कोणती लागतील याची सर्व माहिती आजच्या लेखात पाहणार आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंब योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंब योजना योजनेचा उद्देश

ही योजना शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत करते आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करते. या योजनेतून विविध सिंचन घटकाला अनुदान वितरित केले जाते.

योजनेंतर्गत मिळणारे अनुदान

  1. नवीन विहिरीसाठी अनुदान – 4 लाख रुपये
  2. जुनी विहीर दुरुस्तीसाठी अनुदान – 1 लाख रुपये
  3. शेततळ्यासाठी अनुदान – प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा जास्तीत जास्त 2 लाख रुपये
  4. विहीर दुरुस्तीसाठी किंवा नवीन विहिरीसाठी अतिरिक्त अनुदान – 50 हजार रुपये

लाभार्थी आणि पात्रता

  • या योजनेचा लाभ 0.40 ते 6.00 हेक्टर पर्यंत वाहीत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना मिळतो.
  • राज्यातील मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू आहे.
  • ही योजना विशेषतः अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • सर्व शेतकऱ्यांनी महाडीबीटी (Mahadbt) वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी.
  • याच माध्यमातून अनुदान मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी फायदे

  • शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास आणि आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत.
  • सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने शेती अधिक सक्षम आणि फायदेशीर होणार.

कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंब योजना कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी सांगितले की, या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या शेतीला अधिक समृद्ध करावे. या योजनेतून अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी या पोर्टल वर अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंब योजना अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a comment