Kisan Credit card : शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना या किसान क्रेडिट कार्ड ( KCC ) अंतर्गत कर्ज घेऊन आपल्या शेतीसाठी लागणारा खर्च भागवण्यास मदत होईल. या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ही अगोदर 3 लाख रुपये पर्यंत होते परंतु केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit card) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा 5 लाखावरून 5 लाखापर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी अधिक आर्थिक मदत मिळेल. मागील 10 वर्षांमध्ये किसान क्रेडिट कार्ड वरून होणाऱ्या वित्तपुरवठ्यामध्ये वाढ झाली आहे .यासंदर्भतील माहिती समोर आली आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजना कधी राबवण्यात आली?
किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit card) ही योजना 1998 मध्ये सुरू करण्यात आली होती . सुरू करण्यात आल्यापासून ते आतापर्यंत या योजनेत अनेक वेळा बदल करण्यात आले आहेत .आता या योजनेत निर्मला सीताराम यांनी अर्थसंकल्पात कर्ज मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती . शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत मिळणारे कर्ज 5 लाखापर्यंत वाढवण्यात आले आहेत .
हे वाचा : सौर कृषि पंप अंतर्गत शेतकऱ्यांना वेंडर निवण्यासाठी पर्याय उपलब्ध.
Kisan Credit card आतापर्यंत 7 कोटी 72 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी लाभ
देशभरात किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit card) असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही 7 कोटी 72 लाखापेक्षा जास्त आहे . किसान क्रेडिट कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना मागील 10 वर्षात होणाऱ्या वित्तपुरवठ्यात वाढ झाली आहे . किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत मार्च 2014 मध्ये 4.26 लाख कोटीच्या कर्जाचे वाटप करण्यात आले होते . तर,डिसेंबर 2014 पर्यंत ही रक्कम 10.05 लाख कोटीवर पोहोचली आहे .
शेतकऱ्यांना संकेत कार्डावरून शेतीसाठी किफायतशीर व्याज दरात भांडवल उपलब्ध होते .ज्यामुळे शेतकऱ्यांना शेती आणि शेती संबंधित गोष्टींसाठी वित्तपुरवठा किसान क्रेडिट कार्ड वरून केला जातो .
Kisan Credit card (केसीसी) कशासाठी उपयोगी?
- शेतीसाठी बियाणे, खते, औषधे खरेदीसाठी मदत.
- पीक काढणी व इतर शेतीसंबंधी खर्चासाठी उपयोगी.
- 2019 मध्ये डेअरी व मत्स्य उद्योगालाही केसीसी योजनेत समाविष्ट केले गेले.
किसान क्रेडिट कार्डाच्या कर्जाची मर्यादा आणि व्याजदर
आतापर्यंत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत 3 लाख रुपये पर्यंत कर्ज 7 टक्क्यांनी दिले जायचे पण आता या कर्जाची मर्यादा 5 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे .यामध्ये शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत जर आपले कर्ज वेळेवर परतफेड केले तर 3 टक्के व्याज माफ केले जाते . म्हणजे शेतकऱ्यांना हे पैसे फक्त 4 टक्के व्याज दराने उपलब्ध होतात.
जर शेतकऱ्यांनी जुन्या नियमाप्रमाणे किसान क्रेडिट (KCC) कार्ड वरून 1.60 लाख रुपये पर्यंतची रक्कम विनाकारण दिल जाते. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit card) ही योजना कमी व्याज दराने आणि कमी त्रासात अतिशय फायदेशीर ठरणार आहे .केंद्र सरकारने 2025 – 26 मध्ये कृषी क्षेत्रासाठी 127290 कोटीची तरतूद केली आहे .
किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार
किसान क्रेडिट कार्ड वरील कर्जाच्या मर्यादेत जी वाढ करण्यात आली आहे त्याचा फायदा या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे आणि योग्य वेळेत परतफेड केले आहे, अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे . किसान क्रेडिट कार्डच्या एकूण सदस्यांच्या 10 टक्के म्हणजेच जवळपास 80 लाख सदस्यांना 5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल. Kisan Credit card