MAHARASHTRA BUDGET महाराष्ट्र राज्याचा 2025- 26 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजित पवार यांनी आज सादर केला. अर्थमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 11 वा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा तसेच अमलबजावणीची कार्यप्रणाली याची तरतूद करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने आग्रा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यासोबतच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे संगमेश्वर या ठिकाणी भव्य असे स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा देखील या ठिकाणी करण्यात आली.

महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठी चालना देण्यासाठी खाजगी आणि शासकीय गुंतवणूक तसेच नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात या चार प्रमुख घटकांमध्ये वाढ होणे आवश्यक असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले. त्यासोबतच दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषद मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाकडून एकूण 63 कंपन्यासोबत करार करण्यात आला आहे. या कराराद्वारे येत्या काही काळात राज्यात 15 लाख 72 हजार 654 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून सुमारे 16 लाख युवकांना रोजगार निर्मिती होण्याचा अंदाज देखील या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे.
अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या घोषणा MAHARASHTRA BUDGET
छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीने जागा देखील उपलब्ध करून घेण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक संगमेश्वर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधी स्थळ वडू बुद्रुक या ठिकाणचे भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक असणारे पानिपत या ठिकाणी स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे हरियाणा सरकारच्या मदतीने स्मारकासाठी जागा उपलब्ध करून या ठिकाणी स्मारक बांधण्यात येईल.
राज्य शासनाने 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य निर्यात प्रस्थान धोरण जाहीर केले या निर्यातीमध्ये वाढ होण्याकरिता राज्यात 37 विशेष आर्थिक क्षेत्र, 8 कृषी निर्यात क्षेत्र, निर्यात केंद्रीत 27 औद्योगिक पार्क उभारण्यात आले आहेत. त्यामुळे देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्र राज्याचे योगदान 15.4% झाले आहे.
लॉजिस्टिक धोरण 2024 राज्यामध्ये जाहीर करण्यात आलेले असून त्यामधून दहा हजार एक राहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत विविध प्रकल्पांना देऊ केलेल्या विशेष विशेष प्रोत्साहन व मिळणाऱ्या सुविधामुळे सुमारे पाच लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच वांद्रे कोरला संपून कुर्ला वरळी वडाळा गोरेगाव नवी मुंबई विरार बोईसर आणि खारघर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्र नव्याने निर्माण केली जाणार आहे.

MAHARASHTRA BUDGET पुढील येणाऱ्या नवीन पिढीला रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केल्या जाणाऱ्या नवीन उपक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर व्हावे याकरिता नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येईल. यासोबतच मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्याच्या 140 बिलियन डॉलरवरून सन 2030 पर्यंत 300 बिलियन डॉलर तसेच सन 2047 पर्यंत एक पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवलेले आहे.
राज्यामध्ये नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून ओळखला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 21,830 कोटी रुपयांची गुंतवणुकीचा करार करण्यात आलेला आहे. या कराराच्या माध्यमातून 7500 नवीन रोजगार निर्मिती होईल.
गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळणासाठी खणीकर्म महामार्गाचे जाळे निर्माण केले जात असून त्याकरिता पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 500 कोटी रुपये किमतीची कामे सरकारने हाती घेतले आहेत. MAHARASHTRA BUDGET
समतोल प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक प्रोत्साहन योजना राबविण्यात येत आहेत या योजनेच्या अंतर्गत 2025 26 मध्ये 6400 कोटी रुपये प्रस्थान अनुदान प्रस्तावित करण्यात आले आहे. MAHARASHTRA BUDGET
महावितरण कंपनीकडे पुढील पाच वर्षासाठीचे विजेचे दर निश्चित करण्यासाठी प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियमक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येथे पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये 1 लाख 13 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे यामुळे राज्यातील औद्योगिक वीजदर इतर राज्याच्या तुलनेत अत्यंत कमी असतील. MAHARASHTRA BUDGET
महाराष्ट्र राज्याला अत्यंत निसर्गरम्य प्राचीन लेण्या गड किल्ले घनदाट वनसंपदा असा वारसा लाभला आहे पर्यटन क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीसाठी उस्तावर्धक आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्याकरिता पर्यटन धोरण 2024 जाहीर करण्यात आली आहे येत्या दहा वर्षांमध्ये पर्यटन क्षेत्रात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. राज्याचे आरोग्य पर्यटन धोरण देखील आखण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याकरिता महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशन याची स्थापना करण्यात येणार आहे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल. राज्यातील आत्मा विणकारांना प्रोत्साहन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर या ठिकाणी अर्बनहाटकेंद्रा याची स्थापना करण्यात येणार आहे. MAHARASHTRA BUDGET
विविध गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसायासाठी अधिक पूरक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने जुलै 2023 मध्ये महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा कायदा लागू करण्यात आला आहे उद्योजकांना त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी तसेच नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी 17 विभागाकडून देण्यात येणाऱ्या 141 सेवा आता मैत्री या संकेतस्थळा मार्फत नव्याने देण्यात येईल येणार आहे. MAHARASHTRA BUDGET
निकषावर आधारित राज्याचे दीर्घकालीन व सर्वसमावेशक अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा सन 2025 ते 47 तयार करण्याचे धोरण आखलेले आहे. या नवीन धोरणाच्या माध्यमातून राज्यातील पर्यटन केंद्र तीर्थक्षेत्र धार्मिक स्थळ गड किल्ले, राष्ट्रीय उद्याने अभयारण्य तसेच 5000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या वसाहती आणि सर्व जिल्हा मुख्यालय व तालुका मुख्यालय जोडण्याकरिता रस्त्यांचा समावेश करण्यात येणार आहे. MAHARASHTRA BUDGET
वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग 760 किलोमीटर लांबीच्या 86 हजार 300 कोटी रुपये किमतीची भूसंपादनाची कार्यवाही अत्यंत प्रगतीपथावर आहे.
चैतन्य भूमी दादर मुंबई येथे इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम सुरू असून त्यासाठी आवश्यक असणारा पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे मूळ जन्मगाव असलेल्या नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे त्याचे स्मारक आणि प्रशिक्षण केंद्र देखील उभारण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पातील इतर काही महत्वाच्या घोषणा.
राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये 1 रुपयाची गुंतवणूक केली, तर स्थूल राज्य उत्पन्नात 2.5 ते 3.5 रुपयांची वाढ होते, याचा विचार करून विमान चालन, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जल वाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन व दळणवळण क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा शासनाचा निर्धार आहे. MAHARASHTRA BUDGET
पालघर जिल्ह्यात मौजे मुरबे येथे बंदर निर्मितीच्या 4 हजार 259 कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पाला खासगी क्षेत्राच्या सहभागाने मंजूरी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन” या 450 कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे 158 कोटी रुपये किंमतीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या राज्यातील नागरीकांच्या जीविताचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर रक्षण होईल.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे काम 99 टक्के पूर्ण झाले असून त्यासाठी 64 हजार 755 कोटी रुपये खर्च झाला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 6 हजार डिझेल बसचे रुपांतर सीएनजी आणि एलएनजी बसमध्ये करण्याची प्रक्रिया जलद गतीने सुरु आहे.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 2 राज्यातील 7 हजार 201 गावांमध्ये राबविण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये 351 कोटी 42 लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.
गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार ही योजना महाराष्ट्र राज्यात कायमस्वरुपी राबविण्यात येणार आहे. MAHARASHTRA BUDGET
राज्य शासनाने महत्वाची तापी महापुनर्भरण हा 19 हजार 300 कोटी रुपये किंमतीचा जल सिंचन प्रकल्प हाती घेण्याचे काम ठरवले आहे.
केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2 लाख 13 हजार 625 लाभार्थी शेतकऱ्यांना पुढील दोन वर्षांसाठी 255 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. MAHARASHTRA BUDGET
3 thoughts on “MAHARASHTRA BUDGET 2025 राज्याच्या अर्थसंकल्पातील काही महत्वाच्या घोषणा.”