pocra 2 village list महाराष्ट्र राज्य शासनाने कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यात पोखरा योजना महाराष्ट्र पोखरा टप्पा 2.0 राबवण्यास मान्यता दिली. या टप्पा 2 मध्ये राज्यातील कोणत्या गावांचा समावेश करण्यात आला याबद्दलची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमध्ये कोणकोणती गावे समाविष्ट करण्यात आले आहे याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत.
Pocra 2.0 Village list शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात आला. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 5000 पेक्षा जास्त गावाचा समावेश करण्यात आला होता. आता दुसरा टप्पा शासनाकडून राबविण्यात येत आहे. या टप्प्यांमध्ये शासनाकडून जवळपास 7000 गावांचा समावेश करण्यात आला आहे ही गावे कोणती आहेत त्याची लिस्ट खाली आपल्याला दिलेली आहे.
pocra 2 village list पोकरा योजना म्हणजे काय
देशातील प्रसिद्ध व्यक्ती भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना विविध शेती उपयोगी घटकांसाठी अनुदान व्यतिरिक्त केलं जातं हे अनुदान घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागतात अर्ज सादर केल्यानंतर शेतकऱ्यांना डीबीटीच्या अंतर्गत हे अनुदान वितरित केलं जातं. Pocra 2.0 Village list pdf
पोकरा योजनेतून मिळणारे लाभ
राज्यातील शेतकऱ्यांना शेती उपयोगी वस्तू तसेच तंत्रज्ञान आवश्यक आहे त्यामुळे माझ्यातील शेतकऱ्यांची उत्पन्न मर्यादा वाढेल या हेतूने शासनाकडून शेतकऱ्यांना शेततळे विहीर पाईपलाईन जुन्या विहिरीची दुरुस्ती ठिबक सिंचन तुषार सिंचन मधमाशीपालन सोलार वॉटर पंप ट्रॅक्टर शेती उपयोगी अवजारे तसेच अनेक घटकांसाठी या योजनेच्या माध्यमातून या योजनेची मुख्य म्हणजे रेशीम उद्योगासाठी देखील या योजनेतून मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जाते.
Pocra scheme list pdf download
हे वाचा : ट्रॅक्टर अनुदान योजना
पोकरा योजने अंतर्गत समाविष्ट असणारे जिल्ह्यांची नावे
- भंडारा
- जालना
- बीड
- छत्रपती संभाजी नगर
- परभणी
- हिंगोली
- धाराशिव
- बुलढाणा
- लातूर
- जळगाव
- वर्धा
- अकोला
- अमरावती
- नांदेड
- वाशिम
- चंद्रपूर
- गडचिरोली
- गोंदिया
- नागपूर
- नाशिक
- यवतमाळ
लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे.
- आधार कार्ड
- सातबारा
- आठ अ
- अर्जदार अनुसूचित जाती जमातीत असेल तर जात प्रमाणपत्र
- अपंग असेल तर त्याचा पुरावा
- मोबाईल क्रमांक
pocra 2 village list अंतर्गत निवड झालेले गावे.
pocra 2 village list पोकरा अंतर्गत एकूण 6959 गावांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील किती व कोणत्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. याची पीडीएफ देण्यात आली आहे. पीडीएफ च्या माध्यमातून आपण पोकरा टप्पा 2 अंतर्गत निवड झालेल्या गावांची यादी पाहू शकता.
पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
pocra 2 village list पोकरा योजने मध्ये आधी टप्पा 2 मध्ये 7000 गावांचा समावेश करण्यात आला आहे. पोकरा टप्पा 2 मध्ये समाविष्ट केलेली गावे टप्पा 1 मध्ये जोडलेली नव्हती. टप्पा 1 मध्ये जी गावे जोडली होती ती टप्पा 2 मध्ये वगळण्यात आली आहेत. सरकार टप्या टप्या ने राज्यातील गावे जोडत आहे. पोकरा टप्पा 2 मध्ये जोडण्यात आलेल्या गावांना आता नव्याने लाभ देण्यात येणार आहे.
पोखरा योजना यादी 2025 पोकरा अंतर्गत निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांना आपली नोंदणी करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. पोकरा योजनेतून नवीन अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायत स्थरावर एक समिति स्थापन करावी लागते. सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ही समिति स्थापन केली जाते. समिति स्थापन केल्या नंतर या समिति कडून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना मंजूरी देण्यासाठी ठराव मंजूर केला जातो.