pik vima bogus application केंद्र सरकार कडून देशातील शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी देशात पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनेचा बऱ्याच ठिकाणी गैरफायदा घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. यातच आता अजून एक प्रकार उघडकीस आला आहे. बीड जिल्ह्यातील सीएससी केंद्रावरून तब्बल 18326 शेतकऱ्यांनी नांदेड जिल्ह्यातील गायरान जमिनी, शासकीय तसेच देवस्थानाच्या जमिनीवर बोगस अर्ज भरला असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

भरण्यात आलेले बोगस पिक विमा अर्ज सर्वाधिक बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शेतकऱ्यांची नावे भरणे आलेले आहेत. हा पूर्ण प्रकार मागील दोन वर्षांमध्ये घडलेला आहे. बोगसगिरी चे प्रमाण वाढले असल्याचे पाहून कृषी विभाग आणि विमा कंपनी यांनी अर्जाची कसून चौकशी सुरू केली. या चौकशी दरम्यानच कृषी विभागाला नांदेड जिल्ह्यातील गायरान जमिनीवर पिक विमा अर्ज भरण्याची माहिती निदर्शनात आली.
राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा योजना सहभाग नोंदवताना आधार मिळावा याकरिता राज्यांमध्ये एक रुपयात पिक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेचा गैरफायदा घेतच अनेक शेतकऱ्यांनी आणि सीएससी केंद्र चालकांनी गायरान जमिनी यावरती पीक विम्याचे अर्ज सादर केले. या योजनेमध्ये गैरफायदा घेण्यासाठी काही भामट्यांनी जवळील सीएससी चालकांना आपल्या हाताशी धरून या योजनेमध्ये बोगसगिरी केली आहे.
सर्वाधिक बोगस अर्ज बीड जिल्ह्याचे pik vima bogus application
मागील बऱ्याच दिवसापासून बोगस पिक विमा अर्जांची चर्चा राज्यात सुरू आहे. राज्यामध्ये सर्वाधिक बोगस पिक विमा अर्ज हे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नावे असल्याची माहिती देखील आमदार सुरेश धस यांनी अधिवेशना दरम्यान दिली होती. अधिवेशनाच्या काळात बोगस पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या तसेच केंद्र चालकांच्या नावासहित सविस्तर पुरावे सादर देखील करण्यात आले होते.
pik vima bogus application बोगस पीक विमा अर्ज याच प्रकरणाची दखल घेत राज्यामध्ये कठोर पद्धतीने तपासणी करण्याचे विमा कंपनी आणि कृषी विभागाने ठरवले. यादरम्यान पिक विमा कंपनीला 2023 मध्ये बीड जिल्ह्यातील सीएससी केंद्रावरून एकूण 12879 शेतकऱ्यांनी बोगस पिक विमा अर्ज भरल्याची माहिती निदर्शनात आली.
नांदेड जिल्ह्यातील जमिनीवर बीडचा बोलबाला
पिक विमा अर्जात बोगसगिरी करून बीड जिल्ह्यातील सीएससी केंद्रावरून नांदेड जिल्ह्यातील गायरान जमिनीवर त्यासोबतच शासकीय जमिनीवर आणि देवस्थानाच्या ताब्यातील असणाऱ्या जमिनीवर बीड जिल्ह्यातील 5447 शेतकऱ्यांनी पिक विमा अर्ज सादर केले. या अर्जामध्ये बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. हा भरलेला बनावट पिक विमा यामध्ये सीएससी केंद्र चालक आणि अर्जदार यामध्ये वाटणी या प्रकारानुसार मिळणारी रक्कम 50 टक्के अर्जदाराला व 50 टक्के csc केंद्र चालकाला या प्रमाणे भरण्यात आली असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
सीएससी केंद्र चालकावर गुन्हे दाखल
पिक विमा योजनेमध्ये बोगसगिरी करणाऱ्या सीएससी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीएससी केंद्र चालकांनी भरलेल्या सर्व अर्जाची तपासणी करून जे अर्ज बनावट स्वरूपाचे आहेत असे सर्व अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत.