rbi action : रिझर्व बँक ऑफ इंडिया देशातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. सर्व बँकांना आपले व्यवहार मर्यादा आणि आपले नियम हे रिझर्व बँकेच्या नियमानुसारच आकारावे लागतात. जर या रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नियमाचे एखाद्या बँकेने पालन केले नाही तर त्या बँकेचा परवाना देखील रिझर्व बँकेकडून रद्द केला जाऊ शकतो. याच नियमानुसार रिझर्व (Rbi action) बँक ऑफ इंडियाने एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक या बँकेचा परवाना रिझर्व बँक ऑफ इंडिया ने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेवर याआधी आरबीआय कडून अनेक निर्बंध लावले होते. बँकेवर निर्बंध लादून देखील बँकेमध्ये अपेक्षित असणारी सुधारणा झाली नसल्याचे आरबीआयच्या निदर्शनास आले. यामुळे आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द करण्याची कारवाई पूर्ण केली. आरबीआय बँकेच्या या कारवाईने शंकराव मोहिते पाटील सहकारी बँक परवाना आता रद्द करण्यात आला आहे.
रिझर्व बॅंक ऑफ इंडिया ने केलेल्या या कारवाईमुळे बँकेतील सर्व व्यवहार आता थांबवण्यात आले आहेत. या बँकेवर थोड्या दिवसात अवसायक नेमण्यात यावा या प्रकारच्या सूचना आरबीआय बँकेने दिले आहेत. या देश रिझर्व बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक पांचोली यांनी जाहीर केले आहेत.Rbi action

शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक
शंकराव मोहिते पाटील सहकारी बँकेची स्थापना 1983 साली करण्यात आली. या बँकेच्या अकलूज येथील मुख्य कार्यालयासोबतच या बँकेने करमाळा इंदापूर टेंभुर्णी सोलापूर पुण्यातील कोथरूड या भागासह एकूण नऊ शाखा तयार केल्या. या बँकेवर प्रताप सिंह मोहिते पाटील यांचा एक हाती कारभार होता. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हाती या बँकेचा कारभार चालत होता.Rbi action
हे वाचा : 1 एप्रिल पासून बँकेच्या नियमांत होणार मोठे बदल. खात्यावर ठेवावी लागणार जास्तीची रक्कम.
का केला परवाना रद्द
शंकराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा कारभार हा याआधीच तळाला गेला होता. 2023 मध्येच या बँकेवर आरबीआय कडून अनेक निर्बंध लावण्यात आले होते. या बँकेला मागील वर्षी पण म्हणजे 2024 मध्ये देखील कोणताही दिलासा मिळाला नाही. दरम्यानच्या अशा या परिस्थितीमध्ये देखील या बँकेमध्ये 27 कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता.
या बँकेकडे सध्या पुरेशी भांडवल देखील नाही. त्याशिवाय बँकेला उत्पन्नाची स्त्रोत देखील उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही बँक बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदीचे पालन करू शकत नाही. यामुळे बँकेचा कारभार चालू राहणे हे बँकेच्या ठेवीदारांच्या हिताला अडथळा निर्माण करू शकते. या कारणामुळे रिझर्व बँक ऑफ इंडिया ने बँकेचा परवान रद्द करण्याची कारवाई पूर्ण केली आहे.
या बँकेमधील ठेवीदारांच्या ठेवीवरील संरक्षण योजनेमुळे या बँकेत असणारे ठेवीदार पाच लाख रुपयापर्यंत ठेव असलेल्या रकमेवर विम्याचा दावा करू शकतात. या बँकेकडे विमा संरक्षण संबंधित ९२.७२ टक्के एवढे ठेवीदार उपलब्ध आहेत. यातून बँकेने 47 कोटी 89 लाख रुपये एवढी रक्कम परत देखील केली आहे. Rbi action
2 thoughts on “Rbi action: आरबीआय बँकेची मोठी कारवाई! या बँकेचा परवानाच रद्द!!!”