Tur Kharedi: तूर खरेदीसाठी 15 दिवसाच्या मुदत वाढीची मागणी…!

Tur Kharedi : राज्यातील तूर खरेदीला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने पणन विभागाने तूर खरेदीसाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे .16 मे रोजी ९० दिवसाची मुदतवाढ संपत आहे .त्यामुळे 15 दिवसाची मुदतवाढ मागण्यात आली आहे Tur Kharedi

Tur Kharedi

तूर खरेदीसाठी 15 दिवसाच्या मुदत वाढीची मागणी

राज्यामध्ये 1 लाख 37 हजार 458 शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठी (Tur Kharedi) ऑनलाइन नोंदणी झालेली आहे. यापैकी 52 हजार 971 शेतकऱ्यांकडून 77 हजार 53 मेट्रिक टन तूर खरेदी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार तूर खरेदी प्रक्रियेसाठी 90 दिवसाची मुदत म्हणजेच 13 मे 2025 रोजी संपत आहे. आता राहिलेल्या शेतकऱ्यांची नोंदणीकृत तूर हमीभावाने खरेदी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आहे.

मग ही मागणी लक्षात घेऊन 13 मे 2025 पासून पुढे 15 दिवसाची मुदतवाढ केंद्र सरकारने द्यावी,अशी विनंती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Wheat Sowing गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘लिहोसिन’ची बीजप्रक्रिया ठरणार वरदान! Wheat Sowing

हे वाचा : शेतकऱ्यांना धक्का! या योजनेच्या निधी वाढीला सरकारचा ब्रेक

पीपीएस अंतर्गत तूर खरेदीला मंजुरी

केंद्र शासनाने राज्याला सन 2024 -25 या हंगामात पीपीएस अंतर्गत 2 लाख 97 हजार 430 मॅट्रिक टन तुर खरेदीला मंजुरी दिलेली आहे. यासाठी नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्रीय नोडल संस्थांच्या माध्यमातून राज्यातील 8 राज्यस्तरीय नोडल संस्थामार्फत 764 खरेदी केंद्र राज्यात कार्यान्वित आहेत .

या खरेदी केंद्रामध्ये आतापर्यंत 52 हजार 971 शेतकऱ्यांकडून तुर खरेदी (Tur Kharedi) करण्यात आली आहे 77 हजार 53 मेट्रिक टन तुर खरेदी केली आहे .

हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून हमीभाव खरेदी

राज्यामध्ये नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून 7550 रुपये हमीभावाने तूर खरेदी चालू आहे .सध्या बाजारामध्ये तुरीचा भाव खूप कमी आहे यामुळे शेतकऱ्यांना हमी भावाचा मोठा फायदा शेतकऱ्यांना सध्या होत आहे .त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांची तूर हमीभावानेच खरेदी व्हावी यासाठी तूर खरेदीला मुदत वाढ देण्यात यावी,अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे .Tur Kharedi

Leave a comment