Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! मे महिन्याच्या हप्त्याबाबत आदिती तटकरे यांनी दिली मोठी माहिती…

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, या योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता लवकरच थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. एप्रिल महिन्याप्रमाणेच मे महिन्याचा हप्ताही वेळेवर मिळेल, असे आश्वासन तटकरे यांनी दिले आहे. या घोषणेमुळे राज्यातील हजारो लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपणार आहे. Ladki Bahin Yojana 

20250604 131832

मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

आदिती तटकरे यांनी सांगितले की, “मे महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या थेट खात्यात वितरित केला जाईल. लाडक्या बहिणींना आश्वस्त करायचे आहे की, जसा एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या थेट खात्यात जमा झाला होता, तसाच मे महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.” ही योजना महायुती सरकारने जुलै 2024 पासून सुरू केली असून, आतापर्यंत 10 महिन्यांची रक्कम लाभार्थ्यांना देण्यात आली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता 7 मेच्या सुमारास वितरित करण्यात आला होता. त्यामुळे, मे महिन्याचा हप्ता देखील लवकरच जमा होईल, अशी अपेक्षा आहे.Ladki Bahin Yojana 

हे वाचा : आता शेतीतही होणार AI चा वापर! शेतकऱ्यांचे दिवस पालटणार का ? पहा सविस्तर माहिती…

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
ladki bahin yojana july installment जुलै महिन्याचा ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता जमा ; रक्षाबंधनापूर्वी महिलांना मिळाली भेट. ladki bahin yojana july installment

सरकारी कर्मचाऱ्यांचे लाभ बंद: गैरसमज दूर केले

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेबाबत काही गैरसमज पसरवले जात असल्याचे आदिती तटकरे यांनी यावेळी नमूद केले. विशेषतः, सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याच्या आरोपांवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. तटकरे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे. तीन-चार महिन्यांपूर्वी आम्ही बारकाईने तपासणी (स्क्रूटिनी) केली होती. त्या तपासणीत लक्षात आले होते की, काही सरकारी महिला कर्मचारी या योजनेचा लाभ घेत होत्या. शासकीय कर्मचाऱ्यांचा 2 लाख कर्मचाऱ्यांचा डेटा आम्हाला मिळाला होता, ज्यातील 2 ते 2.5 हजार कर्मचारी हा लाभ घेत होते. जेव्हा हे लक्षात आले, तेव्हापासूनच त्यांना लाभ देणे बंद केले आहे.” त्यामुळे, केवळ पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळत राहील, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

ऊसतोड कामगार महिलांच्या समस्या आणि महिला आयोगाच्या मर्यादा

आदिती तटकरे यांनी यावेळी ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणावर देखील माहिती दिली. याविषयी सरकारने काय कार्यवाही केली, हे त्यांनी सांगितले. “जिल्हाधिकाऱ्यांना ऊसतोड कामगार महिलांच्या आलेल्या रिपोर्टबाबत विचारणा केली आहे आणि त्याची कारणे शोधायला सांगितली आहेत,” असे तटकरे म्हणाल्या.

महिला आयोगासंदर्भातील एका बैठकीबाबत बोलताना तटकरे यांनी सांगितले की, काही कारणांमुळे सर्वांना निमंत्रित करता आले नाही. त्या म्हणाल्या, “बैठकीतून काही सूचना येतील, त्यावर कार्यवाही करू. काही बदल करण्याच्या सूचना आल्या, तर त्या अंमलात आणू.” तसेच, महायुतीतून कुणीही वैयक्तिक टीका केलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिला आयोगाच्या मर्यादा लक्षात घेणे गरजेचे आहे आणि आलेल्या सूचनांचा नक्कीच विचार केला जाईल, असे आदिती तटकरे यांनी अधोरेखित केले.

हे पण वाचा:
Farm Road Model Farm Road Model: शेतात जायला आता मिळणार हक्काचा रस्ता, राज्यभर ‘औसा पॅटर्न’ लागू होणार

या सर्व माहितीवरून हे स्पष्ट होते की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नियमितपणे सुरू राहील आणि पात्र लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळत राहील. तसेच, योजनेतील त्रुटी दूर करून ती अधिक प्रभावीपणे राबवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. Ladki Bahin Yojana 

Leave a comment