fyjc merit list 11 वी प्रवेश यादी जाहीर.

fyjc merit list: अकरावी साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी आणि पालकांसाठी एक आनंदाची बातमी. मागील बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या 11 वी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अकरावी प्रवेश निवड यादी पोर्टलवर जाहीर करण्यात आलेले आहे. अनेक तांत्रिक अडचणीमुळे यादी जाहीर करण्यास वेळोवेळी विलंब झाला होता. त्यामुळे अनेक पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात संभ्रम निर्माण होत होते. याच विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतीक्षा आता संपलेली आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने यावर्षी संपूर्ण राज्यभर अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पोर्टल देखील निर्माण करण्यात आले. या पोर्टलवर अर्ज केल्यानंतर प्रथम प्राधान्य क्रमांक यादी जाहीर करण्यास वारंवार विलंब करण्यात आला होता. आता ही प्रतीक्षा संपलेली आहे. शैक्षणिक विभागाने दिनांक 28 जून 2025 रोजी पहिली प्राधान्य क्रम यादी जाहीर केली आहे.

असे पहा कोणते कॉलेज मिळाले fyjc merit list

अकरावी प्रवेश येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्या कॉलेजमध्ये निवड झाली हे पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. संकेतस्थळावर गेल्यानंतर मेरिट लिस्ट या पर्यायाचा वापर करून त्या ठिकाणी आपला एप्लीकेशन नंबर भरावा लागेल. एप्लीकेशन नंबर भरल्यानंतर सबमिट या पर्यावर क्लिक केल्यावर आपल्याला कोणते कॉलेज मिळाले आहे हे आपल्यासमोर दाखवले जाईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ramchandra Sable Andaj  Ramchandra Sable Andaj : या जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसणार ;तर ‘या’ जिल्ह्यात पूर येणार! पहा हवामान अंदाज

पुढील प्रक्रिया कशी असेल

निवड झालेल्या कॉलेज अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पोर्टलवर लॉगिन करून प्रवेश निश्चित करावा लागेल. त्यानंतर निवड झालेल्या कॉलेजवर हजर राहून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा लागेल. ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निश्चित केल्यानंतर महाविद्यालयात हजर राहून प्रवेश निश्चिती करावी लागेल. या प्रक्रियेसाठी 30 जून 2025 ते 7 जुलै 2025 या वेळेत प्रवेश निश्चित करावा लागेल.

Leave a comment