pashusavardhan yojana 2025: राज्यातील शेतकऱ्यांना पशुधन वाटप करण्यासाठी राज्यात पशुसंवर्धन योजना राबवली जाते. योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून लाभ मिळवता येतो. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले होते त्यांना कागदपत्र अपलोड करण्याचे एसएमएस देखील प्राप्त झाले होते. कागदपत्र अपलोड केल्यानंतर कागदपत्र तपासणी प्रक्रिया राबवली जाते. या कागदपत्र तपासणी दरम्यान ज्या शेतकऱ्यांची किंवा अर्जदारांची कागदपत्रे स्पष्ट नसतील त्यांचे कागदपत्रे परत अपलोड करण्याचा पर्याय देण्यात येत आहे.
ज्या अर्जदाराला कागदपत्र परत अपलोड करण्याचे एसएमएस आले होते त्यांना आता पोर्टलवर पर्याय देखील उपलब्ध झालेला आहे. जी कागदपत्र त्रुटीमध्ये आली आहे ती कागदपत्र नव्याने अपलोड करता येणार आहेत.
कागदपत्रे अपलोड कालावधी pashusavardhan yojana 2025
पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजना योजनेचे पूर्ण वेळापत्रक ठरवलेले असते. हे वेळापत्रक नुसारच सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाते. यानुसार कागदपत्र अपलोड करण्यासाठी 01 जुलै 2025 ते 3 जुलै 2025 हा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्रे त्रुटि मध्ये आले असतील त्यांनी 01 जुलै ते 03 जुलै च्या दरम्यान आपले कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
कागदपत्राबद्दल महत्त्वाची माहिती
पोर्टलवर कागदपत्र अपलोड करताना कागदपत्राची साईज ही 100kb च्या आत असणे आवश्यक आहे. कागदपत्र अपलोड करताना योग्य त्या ठिकाणी योग्य ते कागदपत्र अपलोड करावे. कागदपत्र स्पष्ट असतील अशा स्वरूपात अपलोड करावे. आपले जे कागदपत्र त्रुटीमध्ये आले आहेत तेच कागदपत्र अपलोड करावे लागते.
त्रुटी मधील कागदपत्र अपलोड केल्यानंतर परत या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. या कागदपत्राची तपासणी झाल्यानंतरच पात्रता यादी जाहीर केली जाईल. त्यामुळे लवकरात लवकर त्रुटी मधील कागदपत्र अपलोड करून घ्यावेत. अधिक माहितीसाठी संकेतस्थळावर दिलेली माहिती देखील पाहू शकता. कागदपत्र कशी अपलोड करायची कागदपत्र कोणती अपलोड करायची याची संपूर्ण माहिती खालील व्हिडिओमध्ये दिलेली आहे.