Pik vima update: पिक विमा कंपन्यांच्या मनमानीला लगाम! शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास कायमची बंदी

Pik vima update : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आल्या आहेत. कारण की, आता राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक पिक विमा कंपन्या करू शकणार नाहीत. या मागचे कारण म्हणजे राज्य सरकारने पिक विमा योजनेमध्ये मोठा बदल केला आहे. या बदलामुळे पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पिक विमा योजना लागू होणार आहे. या नवीन पिक विमा योजनेत, ज्या पिक विमा कंपन्यांचा दूषित होईल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. असेच त्यांना ब्लॅक लिस्ट करून शासन यादीतून कायमस्वरूपी वगळण्यात येईल, अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल विधान परिषदेत केली.

आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नांद्वारे पिक विमा कंपन्यांना होत असलेल्य नफ्याबाबत विचारणा केली. मागील 5 ते 8 वर्षात खाजगी विमा कंपन्यांनी हजारो कोटींचा नफा कमवला. पण मात्र, शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत अत्यंत कमी भरपाई मिळाली आहे. याच धरतीवर, आमदार मिटकरी यांनी अशा कंपन्यांवर तातडीने कारवाई करे अशी मागणी केली होती. या मागणीला उत्तर देत असताना कृषी मंत्री कोकाटे यांनी हे महत्त्वपूर्ण आश्वासन दिले आहे.Pik vima update

Pik vima update

नवीन पिक विमा योजनेत पीक कापणी प्रयोगावर भर

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे म्हणाले की,आता राज्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर योग्य आणि खात्रीशीर नुकसान भरपाई दिली जाईल याची जबाबदारी सरकार घेत आहे.या नवीन पिक विमा योजनेमध्ये पीक कापणी प्रयोगाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे .याचा अर्थ असा की,प्रतीक्षा शेतात जाऊन पिकाची कापणी केली जाईल आणि त्याचे उत्पादन मोजले जाणार आहे जर हे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी असेल तर शेतकऱ्याला त्यानुसार नुकसान भरपाई दिली जाणार आहे.यामुळे नुकसान भरपाईच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार आहे. असा विश्वास कृषीमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
pik vima arj 2025 pik vima arj 2025 पीक विमा योजनेकडे राज्यभरातील शेतकऱ्यांची पाठ: कारणे आणि परिणाम

या नवीन पिक विमा (Pik vima update) योजनेमुळे शेतकऱ्यांच्या हिताचे अधिक संरक्षण होणार आहे .अनेक वेळा असे होते की पिक विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत असतात किंवा नुकसान भरपाई कमी देतात,अशा अनेक तक्रारी येत होत्या.पण एकात्मिक प्रयोगामुळे नुकसानीचा अंदाज घेणे शक्य होणार आहे,आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे नुकसान भरपाई मिळण्यास मदत होणार आहे.

राज्याचे कृषिमंत्री यांनी स्पष्ट केले आहे की,नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे,अशा शेतकऱ्यांना एनडीआरएफ ( NDRF) म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून मदत मिळणार आहे. नवीन पिक विमा योजनेमध्ये कोणताही पात्र शेतकरी विमा पासून वंचित राहणार नाही, याची काळजी सरकार घेईल.Pik vima update

हे वाचा : पशूसंवर्धन योजना 2025 अशी करा कागदपत्रे अपलोड

हे पण वाचा:
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: फक्त 20 रुपयात मिळणार 2 लाखाचे विमा संरक्षण, संकटात बनेल मोठा आधार!अर्ज कसा करायचा?

विमा कंपन्यांचा मोठा नफा, शेतकऱ्यांची निराशा

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभा परिषदेत दिलेल्या लेखी उत्तरात पिक विमा कंपन्यांच्या नफ्याची आकडेवारी सादर केली.

  • 2016-17 ते 2023-24 याआठ वर्षाच्या कालावधीमध्ये पिक विमा योजनेअंतर्गत एकूण 43201.33 कोटी रुपयांचा विमा हप्ता जमा झाला होता .
  • त्यातून शेतकऱ्यांना 32629.73 कोटी रुपये नुकसानभरपाई रक्कम देण्यात आली .
  • या आकडेवारीनुसारयाच काळात पिक विमा कंपन्यांनी तब्बल 7,173.14 कोटी रुपयांचा नफा कमवला आहे .

याच आकडेवारीवरून सिद्ध होत आहे की,विमा कंपन्यांनी मोठा नफा कमवला असताना बऱ्याचश्या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात भरपाई मिळाली नाही .त्यामुळे, अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. परंतु आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे विमा कंपन्यांच्या मनमानीला लगाम बसेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल,अशी अपेक्षा केली जात आहे .Pik vima update

हे पण वाचा:
kharif pik vima kharif pik vima: मागील चार दिवसांमध्ये राज्यात किती शेतकऱ्यांनी नोंदवले पीक विमासाठी नाव ?

Leave a comment