LIC ची खास योजना, फक्त 4 वर्षाच्या प्रीमियम मध्ये मिळवा 1 कोटी रुपये , काय आहे स्कीम? जाणून घ्या LIC Jeevan Shiromani policy

LIC Jeevan Shiromani policy : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आपल्या ग्राहकांसाठी हमेशा आकर्षक आणि फायदेशीर योजना नेहमीच घेऊन येत असते. आता अशीच एक नागरिकांसाठी एलआयसी ने जीवन शिरोमणी नावाची एक खास योजना सुरू केली आहे. एलआयसी मध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात . त्यातीलच ही एक जीवन शिरोमणी नावाची खास योजना आहे. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत तुम्हाला फक्त 4 वर्षासाठी प्रीमियम भरावा लागतो. आणि त्यानंतर तुम्हाला कमीत कमी 1 कोटी रुपयांच्या विमा रकमेची हमी मिळवू शकतात. ज्यामुळे ज्या ग्राहकांना सुरक्षित आणि जास्त परताव देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी जीवन शिरोमणी एक चांगला पर्याय ठरू शकते. या योजनेत कमाल विमारकमेवर कोणतीही मर्यादा नाही, म्हणजेच तुम्ही तुमच्या गरजेनुसार कितीही मोठ्या रकमेचे विमा संरक्षण घेऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती LIC Jeevan Shiromani policy

LIC Jeevan Shiromani policy

काय आहे जीवन शिरोमणी योजना (LIC Jeevan Shiromani policy)

एलआयसीची जीवन शिरोमणी पॉलिसी ही एक नॉन- लिंक्ड , वैयक्तिक बचत आणि जीवन विमा आहे .याचा अर्थ असा की ही योजना शेअर बाजार अशी जोडलेली नाही त्यामुळे तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते .ज्या ग्राहकांचे उत्पन्न चांगले आहे आणि त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर सुरक्षितता तसेच चांगला परताव पाहिजे, अशा ग्राहकांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे .LIC Jeevan Shiromani policy

प्रीमियम आणि विमा रक्कम

जर तुम्ही 1 कोटी रुपयाच्या विमा रकमेची पॉलिसी घेतली तर तुम्हाला वर्षाला कमीत कमी 94,000 रुपये प्रीमियम भरावा लागेल .हा प्रीमियम तुम्हाला फक्त पहिल्या चार वर्षासाठीच भरावा लागतो .हा प्रीमियम भरण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत .तुम्ही तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा तीन महिन्यांनी ,सहा महिन्यांनी किंवा वार्षिक आधारावर तुम्ही भरू शकतात.विशेष म्हणजे या योजनेमध्ये तुम्ही कितीही प्रीमियम भरू शकतात.यासाठी कोणतीही मर्यादा नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Kanda Anudan  Kanda Anudan :कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा! 28 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर, तुम्हाला मिळणार का? लगेच पहा

या योजनेसाठी पात्रता

अर्जदाराला या योजनेत (LIC Jeevan Shiromani policy) सहभाग नोंदवण्यासाठी काही पात्रता आणि निकष आहेत. अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्ष असणे आवश्यक आहे . कमाल वयाची मर्यादा पॉलिसीच्या मदतीनुसार बदलते .जर तुम्ही 14 वर्षाच्या पॉलिसीचा पर्याय निवडला तर,अर्जदाराचे वय 55 वर्ष असावे.सोळा वर्षाच्या पॉलिसीसाठी कमाल वय 51 वर्ष,आणि अठरा वर्षाच्या पॉलिसीसाठी कमाल वय 48 वर्ष व वीस वर्षाच्या पॉलिसीसाठी कमाल वय 85 वर्ष निश्चित करण्यात आले आहे .LIC Jeevan Shiromani policy

मनी बॅक चा लाभ

जीवन शिरोमणी ही एक मनी बॅक योजना आहे,पॉलिसीच्या मुदतीदरम्यान तुम्हाला नियमित अंतराने पैसे मिळत राहतात.

  • 14 वर्षाच्या पॉलिसीसाठी 10 व्या आणि 12 व्या वर्षी मूळ विमारतमेच्या 30% रक्कम मिळेल .
  • जर तुम्ही 16 वर्षाची पॉलिसी खरेदी केल्यास,तर तुम्हाला 12 व्या आणि 14 व्या वर्षी मूळ विमारकमेच्या पस्तीस टक्के रक्कम मिळेल .
  • आणि जर तुम्ही 18 वर्षाच्या मुदतीची पॉलिसी खरेदी केल्यास 14 व्या आणि 16 व्या वर्षी मूळ विम्याच्या रकमेच्या 40 टक्के मिळतील .
  • 20 वर्षाची पॉलिसी घेतल्यास तुम्हाला 16 व्या आणि 18 व्या वर्षी मूळ विमा रकमेच्या 45% रक्कम मिळेल .
    पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर उर्वरित विमार्कम तुम्हाला एकर कमी दिली जाते .

कर्ज आणि इतर फायदे

जीवन शिरोमणी पॉलिसीमध्ये तुम्हाला कर्ज घेण्याची सुविधा मिळते .जर तुम्ही ही पॉलिसी घेतल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यावर आणि जर तुम्ही या पॉलिसीचा नियमितपणे प्रीमियम भरल्यानंतर तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकतात .तुमच्या पॉलिसीच्या सरेंडर मूल्यावर कर्जाची रक्कम आधारित असते आणि यावर वेळोवेळी निश्चित केलेल्या व्याजदर लागू होतो .

हे पण वाचा:
Protsahan Anudan शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 50 हजार प्रोत्साहन योजना सुरू, पण ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ.Protsahan Anudan

याविकिरिक्त, या योजनेमध्ये गंभीर आजारांवर लाभ देखील मिळतो .जर पॉलिसी धारकाला पॉलिसीच्या मुदतीदरम्यान कोणत्याही गंभीर आजाराने निधन झाले,तर त्याला विमारकमेच्या दहा टक्के एक रक्कम दिली जाते .यामुळे तुम्हाला उपचारासाठी आर्थिक मदत मिळेल .जर पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला म्हणजेच वारसाला मृत्यू लाभ देखील मिळतो .

जर तुम्हाला एलआयसीच्या जीवन शिरोमणी योजनेबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाईट ला https://licindia.in/ भेट देऊ शकतात . या ठिकाणी तुम्हाला या योजनेची सविस्तर माहिती,नियम आणि अटी तसेच प्रीमियमची गणना कशी करायची याबद्दल विसर माहिती मिळेल .

हे पण वाचा:
Crop Insurance Nuksan Bharpai List शेतकऱ्यांना दिलासा! 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, पहा जिल्ह्यांची यादी.Crop Insurance Nuksan Bharpai List

Leave a comment