Maharashtra Rain: राज्यातील शेतकऱ्यांसाठी तिला देणारी बातमी आहे. हवामान विभागाकडून पुढील चार ते पाच दिवसासाठी राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे . ज्या भागामध्ये मागील काही दिवसापासून पाऊस थांबलेला होता आता त्या भागामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे. आज आपण या लेखांमध्ये पाहूया पाऊस कधी आणि कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. Maharashtra Rain

22 जुलैपासून अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात
हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, 22 जुलै रोजी पासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात होईल. आज संध्याकाळपर्यंत जिल्ह्याच्या जवळपास 50% भागात पाऊस पडेल . पुढील दोन ते तीन दिवस म्हणजेच, 22, 23, आणि 24 जुलै रोजी.काही भागांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.आज सकाळपासून मुंबईच्या पश्चिम उपसागरात पावसाला सुरुवात झाली आहे.Maharashtra Rain
पुढील दोन ते तीन दिवस या जिल्ह्यात पावसाची शक्यता?
पुढील दोन ते तीन दिवस म्हणजेच 22, 23 आणि 24 रोजी काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता देण्यात आली यामध्ये, धाराशिव, लातूर ,नांदेड अहमदनगर ,सोलापूर ,सांगली, सातारा ,संभाजीनगर ,परभणी, जालना ,बीड ,हिंगोली, नाशिक, जळगाव ,बुलढाणा या जिल्ह्यात हवामान विभागाकडून पावसाची शक्यता व वर्तवण्यात आली आहे .
राज्यात पुढील चार ते पाच दिवस दररोज पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस एकाच ठिकाणी नसून टप्प्याटप्प्याने सगळीकडे पडेल . विशेषता: हा पाऊस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही भागांमध्ये पडेल. या पावसाला आजपासून सुरुवात होणार असून पुढील चार ते पाच दिवस चांगला पडणार असून, ज्या भागामध्ये मागील काही दिवसांपासून शेतकरी पावसाची वाट पाहत होते त्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.Maharashtra Rain