योजना अंबलबाजवणीत गैरप्रकार खपवून घेणार नाही
दिनांक 18 जुलै 2024 रोजी शासणाने लागू केलेल्या महत्वाच्या योजना याबद्दल आढावा बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकी मध्ये एकनाथ शिंदे यांनी शासन राबवत असलेल्या महत्वाच्या योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना (मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना) या योजने मध्ये नोंदणी करतांना काही गैरप्रकार घडू नये याकडे जिल्हाधिकारी यांनी विषेच लक्ष घालावे अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
तात्काल कठोर कारवाई करण्याच्या सूचना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये नोंदणी करण्यासाठी किंवा कागदपत्रा संबंधी राज्यातील महिला भगिनी कडून अधिक पैश्यांची मागणी केली तर त्यांच्यावर तत्काल कठोर कारवाई करा. अश्या व्यक्तीला फक्त निलंबित न करता त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर गुन्हा नोंद करा अश्या सूचना उपस्थित असणाऱ्या सर्व जिल्ह्याच्या अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
योजना अंबलबाजवणीत गैरप्रकार खपवून घेणार नाही