राज्यातील या शेतकऱ्यांना लवकर फवारणी पंप वाटप

राज्यातील या शेतकऱ्यांना लवकर फवारणी पंप वाटत

   फवारणी पंप  राज्यातील शेतकऱ्यांसाठी  शासनाने फवारणी पंप  वाटप करण्याचा विशेष कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे खास करून तर राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. राज्य पुरस्कृत सोयाबीन व कापूस मूल्य साखळी आणि उत्पादकता विकास कार्यक्रमांतर्गत, शेतकऱ्यांना अति आवश्यक सुविधांची निर्मिती, मूल्य साखळीचा विकास आणि उत्पादकता वाढविण्यासाठी विविध उपयोजना राबविण्यात येणार आहेत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

  

फवारणी पंप वाटप

फवारणी पंप वाटप उद्देश

    2024 या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप आणि कापूस साठवणूक देण्याची योजना आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज मागविण्यात आले होते. राज्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप वाटप करण्यात येणार होते. सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली होती, त्यानंतर परत अजून राज्य शासनाने 14 ऑगस्ट अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली, आणि परत अजून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यासाठी वेळ वाढविण्यात आला.

फवारणी पंप वाटप लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड

   राज्यातील शेतकऱ्यांनी फवारणी पंपासाठी लाखो अर्ज करण्यात आलेले आहेत, पण मात्र फवारणी पंपाची उपलब्धता कमी आहे आणि अर्ज करण्याची संख्या ही जास्त  प्रमाणात आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना फवारणी पंप मिळणार नाहीत, पण राज्यातील शेतकऱ्यांची फवारणी पंपासाठी लॉटरी पद्धतीने निवड केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड होणार आहे त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर मोफत फवारणी पंप देण्यात येणार आहेत.

वेळेवर फवारणी पंप उपलब्ध होत नसल्यामुळे अर्ज करणारे शेतकरी नाराज

   ज्या शेतकऱ्यांनी फवारणी पंपासाठी अर्ज केलेला होता त्या शेतकऱ्यांना जुलै च्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात फवारणी पंप येणे अपेक्षित होते, जेव्हा शेतकऱ्यांना त्या फवारणी पंपाची खरी गरज होती . मात्र, योजनेच्या अंमलबजावणीला वेळ लागल्यामुळे शेतकऱ्यांना फवारणी पंप हंगामाच्या वेळेस येऊ शकणार नाही. हा फवारणी पंप सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाडीबीटी अंतर्गत इतर योजनेच्या लॉटरीसह या फवारणी पंप योजनेची लॉटरी लागू शकते.

Leave a comment