मुख्यमंत्री यांची शेतकऱ्यांसाठी नवीन घोषणा, नवीन विहिर अनुदान 4 लाख, तर जुनी विहीर दुरुस्तीसाठी 1 लाख अनुदान मिळणार

नवीन विहिर अनुदान

   नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण 5 सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे, त्यापैकी आज आपण शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे बिराज मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. तर यामध्ये 5 सप्टेंबर रोजी  कोणकोणत्या सुधारणा केलेले आहेत. त्या आपण पाहूया.

नवीन विहिर अनुदान योजनेमध्ये सुधारणा

   बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे लाभार्थी हे राज्यातील अनुसूचित जातीतील शेतकरी आहेत. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये , नवीन विहिरीचे खोदकाम, शेततळे, वीज जोडणी, जुन्या विहिरीची दुरुस्ती, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, इनवेल बोअरिंग शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण या बाबींचा लाभ दिला जातो. या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.

नवीन विहिर अनुदान

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
samuhik vivah sohala anudan samuhik vivah sohala anudan: सामूहिक विवाह योजनेअंतर्गत 25,000 रुपय अनुदान सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुख्यमंत्र्याचा निर्णय विहिरीच्या खोदकामासाठी 12 मीटर खोलीची अट रद्द

   शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत, जी नवीन विहिरीच्या खोदकामासाठी 12 मीटर खोलीची अट घालण्यात आली होती, तर ती अट आता रद्द करण्यात आलेली आहे. 12 मीटर खोलीची अट ही अनेक लाभार्थ्यांसाठी खूप अडचणीची ठरत होती.

मागेल त्याला विहीर योजना

दोन सिंचन विहिरीमधील 500 फूट अंतराची अट रद्द

   या योजनेमधील अजून एक अट रद्द करण्यात आलेली आहे ती म्हणजे दोन सिंचन विहिरीमधील 500 फूट अंतरा राखण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे. कारण की अनेक लाभार्थी शेतकरी या योजनेमधून बाद होत होते, उपलब्ध असलेल्या जमिनीच्या कमी क्षेत्रामुळे ही अट पूर्ण करणे लाभार्थी शेतकऱ्यांना कठीण होते. त्यामुळे सरकारने ही अट आता रद्द केलेली आहे.

हे पण वाचा:
Tar Kumpan Yojana Tar Kumpan Yojana :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! तार कुंपण योजनेअंतर्गत ९०% पर्यंत अनुदान; असा करा अर्ज..!

नवीन विहिर अनुदान वाढ

   बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत, अनुसूचित जमातीतील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी या योजनेमध्ये खूप मोठे बदल करण्यात आलेले आहेत. या योजनेमध्ये जे अनुदान दिले जात होते त्या अनुदानाच्या मर्यादा वाढवण्यात आलेले आहेत, शेतकऱ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ दिला जाणार आहे.

नवीन विहिरीचा लाभ घेण्यासाठी अनुदानामध्ये वाढ

  नवीन विहिर अनुदान  या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवीन सिंचन विहिरीसाठी दिले जाणारे अनुदान आता ₹ 2,50,000 वरून ₹ 4,00,000 करण्यात आलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सिंचन सुविधांसाठी जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळणार आहे.

जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी दिले जाणारे अनुदान

  नवीन विहिर अनुदान बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अगोदर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी ₹ 50,000 दिले जात होते, परंतु आता या योजनेअंतर्गत हे अनुदान 1 लाख रुपये करण्यात आलेले आहे. तसेच बोरिंग साठी हे अनुदान या अगोदर 20 हजार रुपये  होते आता हे अनुदान 40 हजार रुपये करण्यात आलेले आहे.

हे पण वाचा:
Tractor subsidy Tractor subsidy :शेतकऱ्याना ट्रॅक्टर आणि शेती अवजारांवर आता 50% पर्यंत सरकारी अनुदान!

मोटार संच आणि शेततळ्याच्या अनुदानात वाढ

  नवीन विहिर अनुदान बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत मोटार संच किंवा इतर यंत्रसामग्रीसाठी 50 हजार रुपये अनुदान देण्यात येईल, तर परसभागासाठी 5 हजार रुपये अनुदान निश्चित करण्यात आलेले आहे. तसेच, शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी या योजनेअंतर्गत 1 लाखा  रुपये ऐवजी   2 लाख रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

तुषार आणि ठिबक सिंचन अनुदानात वाढ

    तुषार सिंचनासाठी 25 हजार रुपये अनुदान देण्यात येत होते, पण ते आता या योजनेअंतर्गत 47 हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के पर्यंत वाढविण्यात आलेले आहे. ठिबक सिंचनासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना 96 हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अनुदान देण्यात येणार आहे.

नवीन विहिर अनुदान सर्वात महत्त्वाची अट रद्द

   बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत 12 मीटर खोलीची अट आणि दोन सिंचन विहिरी मधील 500 फुटाचा अंतर या अटी या योजनेअंतर्गत रद्द करण्यात आलेले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आता  अटीमुळे बाद होण्याची गरज पडणार नाही.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana July Hafta Ladki Bahin Yojana July Hafta: लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार GR आला, कोणाला मिळणार हप्ता?

   राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, लवकरात लवकर या सुधारित योजनेचा शासन निर्णय (GR) निर्माण केला जाईल, आणि शेतकऱ्यांना या अनुदान वाढीचा  लाभ मिळण्यास मदत होईल.

Leave a comment