पीएम आवास ग्रामीण केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी कार्य घोषणा केली यामध्ये पीएम आवास योजना ग्रामीण यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आल्याची घोषणा केली आहे या योजनेत ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाकडे दुचाकी मोटर आधारित मासेमारी बोटी, लँडलाईन फोन होते त्या सहभागी होता येत नव्हतं. अखेर या अटी कमी करण्यात आल्याची घोषणा यांच्याकडून करण्यात आली याशिवाय कौटुंबिक मासिक उत्पन्नाची अट देखील यामध्ये बदल करण्यात आला आहे काय असणार कौटुंबिक मासिक उत्पन्नाची अट ते पाहूयात
पीएम आवास ग्रामीण अंतर्गत च्या बऱ्याच अटी बदलण्यात आले आहे. यामध्ये ज्या ग्रामीण भागातील कुटुंबाकडे मोटरसायकल किंवा मोटर नियंत्रित मासेमारीची बोट लँडलाईन अंतर्गत चा फोन किंवा फ्रिज असेल त्यांना आता पीएम आवास योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. याशिवाय कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी असेल त्यांना देखील अर्ज करता येणार आहे. याआधी हे उत्पन्न मर्यादा दहा हजार रुपये एवढी ठेवण्यात आलेली होती.
पीएम आवास ग्रामीण योजना महत्त्वाच्या अटी
ज्या व्यक्तीकडे तीन चाकी किंवा चार चाकी वाहन आहेत. तसेच शेतीसाठी आवश्यक असणारे तीन व चार चाकी वाहन किंवा एखादं यंत्र त्यासोबतच किसान क्रेडिट कार्ड ज्याची मर्यादा 50 हजार असेल, सरकारी कर्मचारी, नोंदणीकृत उद्योजक, आयकर रिटर्न भरणारे व्यक्ती, व्यवसाय कर भरणारे व्यक्ती व अडीच एकर पेक्षा अधिक जमीन असणाऱ्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना पीएम आवास योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही.
यासोबतच केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी जमीन धारणे संदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यात येतील असे सांगितले आहे. त्यासोबतच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण द्वारे लाभार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. यामध्ये ग्रामीण भागातील घर बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये तर डोंगराळ भागात घर बांधणीसाठी एक लाख तीस हजार रुपयांची आर्थिक मदत पीएम आवास योजनेअंतर्गत केली जाते.
पीएम आवास ग्रामीण हप्ता होणार वितरित
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याकडून येत्या 15 सप्टेंबरला पीएम आवास योजनेचा ग्रामीण भागातील लाभार्थ्यांचा हप्ता रुपये रक्कम 2745 कोटी वाटप करणार आहे. याकरिता झारखंड मधील जमशेदपूर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या ठिकाणाहून पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे.