Aadhar Card Center : आजकाल शासकीय कामाचे कागदपत्रे काढण्यासाठी आधार सेंटर हे खूप महत्त्वाचे झालेले आहे. शासकीय कामाबद्दल कोणतेही कागदपत्र काढायचे असेल तर सर्वात पहिले आधार सेंटर ला जावे लागते. त्यामुळे आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी अत्यावश्यक झाले आहे. आधार नोंदणी, अपडेट्स आणि बायोमेट्रिक बदल यासाठी नागरिकांना आधार सेवा केंद्रांची आवश्यकता आहे.
आधार सेंटर हे कोणालाही चालू करता येते. पण मात्र, त्यासाठी आधार कार्ड सेंटरची फ्रँचायझी घ्यावी लागते. त्याबरोबरच तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल. त्याशिवाय तुम्हाला आधार कार्ड सेंटर सुरू करता येणार नाही . ही परीक्षा तुम्हाला भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (UIDAI )आयोजित करण्यात येते. ही परीक्षा दिल्यानंतर त्या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला आधार सर्व्हीस सेंटर सुरू करण्यासाठी परवाना दिला जातो तर , यानंतर तुम्हाला कॉमन सर्व्हीस सेंटरमध्ये रजिस्ट्रेशन करावा लागेल .हे कसं करायचं याबद्दलची प्रोसेस खालील प्रमाणे पाहूया.
Aadhar Card Center उघडण्याचे फायदे
आधार कार्ड सेवा केंद्र उघडल्यास नागरिकांना त्यांच्या जवळच आधार संबंधीत सर्व सेवा सहज उपलब्ध होतात. आधार नोंदणीपासून बदलांपर्यंत अनेक सेवा देण्याची संधी फ्रँचायझी धारकाला मिळते, ज्यातून उत्पन्नही होऊ शकते.
हे वाचा : गॅस सिलेंडरची झंझट संपली,आता मोबाईलद्वारे फ्री सोलार स्टोव्ह ऑनलाइन बुक करता येणार.
Aadhar Card Center फ्रँचायझी मिळवण्यासाठी पात्रता
- फ्रँचायझी मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय हे 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
- अर्जदार व्यक्तीने कमीत कमी 10 वी उत्तीर्ण केलेली असावी.
- अर्जदार व्यक्तीला संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे . कारण आधार सेवा केंद्र चालवण्यासाठी संगणक, इंटरनेट कनेक्शन, बायोमेट्रिक डिव्हाइस, प्रिंटर आणि स्कॅनर या साधनांची गरज असते.
Aadhar Card Centerअर्ज प्रक्रिया
- कॉमन सर्विस सेंटर मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल .
- या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर Create New User वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला कोड शेअर सांगितले जाईल.
- Shaer Sode साठी अधिकृत वेबसाईटवर या लिंक वर जाऊन ऑफलाइन ई-आधार डाऊनलोड करा.
- त्यानंतर तुम्हाला XML File आणि Sher Code उपलब्ध होईल.
- त्यानंतर तुम्हाला अर्ज दाखल करण्याची माहिती देणाऱ्या विंडोज वर यावे लागेल आणि फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला फोन आणि ई-मेल वर ID आणि password येईल.
- या User ID आणि password च्या माध्यमातून Aadhar Testing and Certification या पोर्टलवर लॉगिन करा.
- या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म उपलब्ध होईल तो भरा. त्यावर तुमचा फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी अपलोड करा.
- Proceed to submit form या पर्यावर क्लिक करा. शेवटी तुम्हाला शुल्क भरावा लागेल.
- यासाठी तुम्हाला वेबसाईटच्या Meenu पर्यावरण क्लिक करून पेमेंट पर्यावर क्लिक करून शुल्क भरावा लागेल.
- सेंटर बुक करण्याची प्रक्रिया आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला दोन दिवस वाट पाहावी लागेल.
- त्यानंतर पुन्हा संकेतस्थळावर लॉगिन करा आणि Book Centre पर्यावरण क्लिक करा.
- तुमच्या जवळचे कोणतेही सेंटर निवडा आणि परीक्षेसाठीचा वेळ, तारीख निवडा.
- Admit Cart डाऊनलोड करा व ठरलेल्या दिवशी वेळेवर परीक्षेसाठी सेंटरवर उपस्थित रहा.
Aadhar Card Center पेपर पास झाल्यानंतर काय करावे लागेल?
जर तुम्ही या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालात तर तुम्हाला आधार कार्ड सेंटरची फ्रँचायझी सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड संबंधित कामकाज सुरू होते. विशेष म्हणजे याची फ्रँचायझी मोफत मिळते. आधार सेवा केंद्र उघडण्यासाठी काही प्राथमिक गुंतवणूक करावी लागते.म्हणजेच तुमला आवश्यक उपकरणे आणि तांत्रिक साहित्य खरेदी करावी लागते. जसे, कार्यालय, संगणक, इंटरनेट अगदी व्यवस्था असावी लागते .
निष्कर्ष
आधार कार्ड सेवा केंद्र उघडल्यास नागरिकांना सेवा पुरवता येते आणि उत्पन्नाची संधी मिळते. या प्रक्रियेत आवश्यक अर्ज, पात्रता आणि प्रशिक्षण घेतल्यास एक लाभदायक व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.Aadhar Card Center
1 thought on “Aadhar Card Center: सुरू करायचे असेल तर, जाणून घ्या संपूर्ण माहिती.”