आपले सरकार केंद्र चालकांना मिळणार 10000 रुपये मानधन. aaple sarkar seva kendra.

aaple sarkar seva kendra : केंद्र चालकांना मिळणार 10000 रुपये मानधन. मागील दहा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करत असणाऱ्या संगणक परिचालकांना आपले सरकार सेवाकेंद्र चालक) शासनाकडून मानधन वाढ देण्याचा आली आहे. संगणक परिचालक मागील दहा वर्षापासून ग्राम स्तरावर शासनाच्या विविध योजना तसेच ग्रामपंचायतचे विविध ऑनलाइन कामे करतात त्या संगणक परिचालकांना सरकारकडून न्याय मिळावा व हक्काचे मानधन मिळावे याकरिता संघटने कडून अनेक वेळा आंदोलन देखील करण्यात आले होते या आंदोलनाचे दखल घेत राज्य शासनाने संगणक परिचालकांना मानधन वाढीचा निर्णय घेतला आहे.

aaple sarkar seva kendra

aaple sarkar seva kendra मिळणार 10000 रुपये मानधन.

आपले सरकार सेवा केंद्र चालक संगणक परिचालक यांना ग्रामरोजगार सेवकांच्या धर्तीवरच मानधन देण्याचे शासनाने घोषित केले यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालकांना प्रति महिना 10 हजार रुपये एवढे मानधन देण्याचा निर्णय सरकारकडून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवाकेंद्र चालक आहेत या केंद्र चालकांना याआधी खाजगी कंपनीकडून नियुक्ती देण्यात आलेली होती, त्यामुळे कंपनीकडून नियुक्ती न देता शासनाकडून नवीन आकृतीबंध तयार करून यावलकर समितीच्या अहवालानुसार नवीन पद निर्माण करावे व ठराविक तसेच वेळेवर मानधन देण्यात यावे अशी मागणी वेळोवेळी केली जात होती. त्यासाठी संगणक परिचालक संघटनेने तसेच संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी विविध ठिकाणी आंदोलन देखील केले होते.

हे वाचा : निवडणुकीच्या तोंडावर सरकार चे धडाकेबाज निर्णय.

शासनाने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना प्रति महिना 10 हजार रुपये मानधन देण्यास मान्यता दिलेली आहे यामुळे राज्यातील 20 हजार पेक्षा जास्त संगणक परिचालकांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

मागणीचा पाठपुरावा.

मागील काही दिवसापासून अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे तसेच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तसेच तालुका अध्यक्ष आणि संगणक परिचालक याच्याकडून प्रत्येक कार्यक्रमात मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री कॅबिनेट मधील मंत्री व दौऱ्या दरम्यान भेटणाऱ्या प्रत्येक राजकीय व्यक्तीला निवेदन देण्याचे काम केले होते. या दिलेल्या निवेदनांची दाखल घेत सरकार कडून संगणक परिचालक यांना मानधन वाढ देण्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Leave a comment

Close Visit Batmya360