achar sanhita action : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 15 ऑक्टोंबर पासून आचारसंहिता लावण्यात आलेली आहे. या आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाकडून सर्व बारीक गोष्टीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. ज्या मध्ये राज्यात विविध भागात कारवाही करण्यात आली आहे. वाहन तपासणी तसेच मिळालेल्या माहितीवर लक्ष ठेऊन कारवाही करण्यात येते. निवडणूक आयोगाने राबवलेल्या ऑनलाइन तक्रार उपक्रमाचा या मध्ये खूप मोठा वाटा आहे.
achar sanhita action राज्यात निवडणुकांचा धुमाकूळ सुरू आहे. पक्ष विविध प्रकारे आपली तयारी करत आहेत उमेदवारी जाहीर करत आहेत. परंतु या सर्व घटनेमध्ये काही आचार संहिता नियमबाह्य कार्य होऊ नये या साठी निवडणूक आयोग लक्ष देऊन आहे. यातच निवडणूक आयोगाने मागील नऊ दिवसांमध्येच खूप मोठ्या प्रमाणावर कारवाई करून मौल्यवान वस्तू त्यासोबतच कॅश जप्त केली आहे मागील नऊ दिवसात निवडणूक आयोगाने एकूण 142 कोटी 74 लाख रुपये किमत असणारे विविध घटक जप्त केले आहेत.
हे वाचा: आचार संहिता म्हणजे काय?
achar sanhita action जमा केलेली रक्कम
निवडणूक आयोगाने मागील 9 दिवसात म्हणजे 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधी मध्ये बेकायदा पैसे , दारू,ड्रग्ज,मोल्यवान वस्तु/धातू यांच्या माध्यमातून 90 कोटी 74 लाख रुपये जमा केले आहेत. तर 52 कोटी रुपयांची मालमत्ता जमा करण्यात आली आहे.
ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा दिल्यामुळे कारवाहीत वाढ
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता उल्लंघन होत असल्यास नागरिकांना आपल्या मोबाइल वरुण तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऑनलाइन तक्रार सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या भागात होत असलेल्या आचारसंहिता नियमबाह्य कार्यावर तक्रार करता येते.cvigil या अॅप च्या माध्यमातून नागरिकांना तक्रार दखल करता येते. या अॅप वर तक्रार दाखल केल्या नंतर निवडणूक आयोग 100 मिनिटाच्या आत त्या तक्रारीवर प्रतिसाद देते. पुढील कार्यवाही निवडणूक आयोगाकडून पार पडली जाते. या मध्ये विशेष म्हणजे तक्रार दाराचे नाव गुप्त ठेवले जाते. त्या मुले निवडणूक आयोगाला कारवाही करण्यासाठी जास्त मदत मिळते. निवडणूक आयोगाकडून सर्व प्रथम अॅप च्या माध्यमातून मिळणाऱ्या तक्रारीवर 100 मिनिटात कारवाही केली जाते.