ADD VOTER LIST NAME राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू केली आहे. येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात येईल. या मतदान प्रक्रियेमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदाराचे नाव मतदान यादीत असणे आवश्यक आहे. ज्या मतदाराचे नाव यादीमध्ये नाही त्यांनी कसे समाविष्ट करावे याबद्दलची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. येत्या १९ ऑक्टोम्बर पर्यन्त नवीन नाव नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती दिली आहे.
ADD VOTER LIST NAME नवीन मतदान यादीत नाव जोडण्यासाठी अर्जदाराचे वय वर्ष १८ पूर्ण असणे गरजेचे आहे. ज्यांचे वय १८ पूर्ण आहे त्यांनी आपली ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी.
मतदान नोंदणी करण्यासाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- पासपोर्ट फोटो
- जन्माचा पुरावा (आधार कार्ड नसेल तरच)
- रहिवाशी पुरावा (आधार कार्ड नसेल तरच)
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी इत्यादी
नवीन नोंदणी करताना आधार कार्ड असेल तर जन्म पुरावा व रहिवाशी पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरण्यात येते. त्या मुळे आधार कार्ड, फोटो, आणि मोबाइल क्रमांक च्या मदतीने आपण आपली ऑनलाइन नोंदणी पूर्ण करू शकतात.
ADD VOTER LIST NAME अर्ज कसा करावा
ADD VOTER LIST NAME मतदान यादी मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया पार पाडता येत आहे यामध्ये आपल्याला शासनाने म्हणजेच निवडणूक आयोगाने अधिकृत केलेल्या संकेतस्थळावर फॉर्म ६ भरून आपण आपले मतदान नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकता अधिक माहितीसाठी खालील प्रक्रियेचा अवलंब करा.
- सर्वप्रथम शासनाचे अधिकृत संकेतस्थळावर जा.
- संकेतस्थळावर गेल्यानंतर त्या ठिकाणी नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
- नोंदणी करण्यासाठी आपल्याला आपला यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करून घेणे आवश्यक आहे.
- युजर पासवर्ड तयार केल्यानंतर त्या युजर आयडी पासवर्ड लॉग इन करा.
- लोगिन केल्यानंतर आपल्यासमोर नवीन नोंदणी फॉर्म ६ हा दिसेल.
- या फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपली वैयक्तिक माहिती आपल्या मतदारसंघाची माहिती आपल्या रहिवाशी पत्त्याची माहिती त्यासोबतच आपला फोटो आपल्या आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र या संपूर्ण घटकांची माहिती भरणे आवश्यक आहे.
- लिंग मोबाईल नंबर नातेसंबंध या सर्व घटकांची माहिती भरल्यानंतर शेवटी आपल्याला कॅप्चर कोड भरून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- सबमिट या पर्यावरण क्लिक केल्यानंतर आपण भरलेली संपूर्ण माहिती आपल्यासमोर प्रदर्शित होईल.
- भरलेली माहिती बरोबर असल्यास सबमिट या पर्यावरण क्लिक करा त्यानंतर आपल्या मोबाईल नंबर एक ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी त्या ठिकाणी भरून सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
- या पद्धतीने आपला अर्ज यशस्वीरित्या सादर झाला आहे.
1 thought on “ADD VOTER LIST NAME मतदान नोंदणी प्रक्रिया”